मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
कृतज्ञ मी – कृतार्थ मी… अर्शद वारसी!
बहुमुखी ,बहुरंगी आणि बहुढंगी प्रतिभेचा अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) ह्याचा ५२ वा वाढदिवस आज १९ एप्रिल ला संपन्न होईल . अर्शद सोबत बातचीत करणं म्हणजे निखळ आनंद .. सेलेब्रिटींसोबत गप्पा -गोष्टी करत त्यांच्या मुलाखती करणं हा एक प्रदीर्घ लेखाचा विषय ठरेल हे नक्की .. बॉलिवूड स्टार्स -कलावंत बहुतेकदा त्यांच्या फिल्म्सच्या रिलीज होण्याच्या वेळेस ‘प्रमोशनल इंटरव्हू ‘देण्यासाठी भेटतात. त्यातही काही वेळेस आपल्या प्रचारकांमार्फत अमूक प्रश्न विचारले जाऊ नयेत अशी सूचनावजा तंबी पत्रकारांना मिळालेली असते
स्टारला एकही प्रश्न सिनेमाच्या परिघाखेरीज विचारला जाऊ नये म्हणून प्रचारक स्टार आणि पत्रकार यांच्यात ठिय्या देऊन असतात .. मग, ह्याही स्थितीत चिवटपणा दाखवत प्रश्न सुरु करावेत तर तुमच्या मुलाखतीची १५ मिनटे संपलेली असतात! असो .. अशा सगळ्या ‘हर्डल्स ‘ ना पार करत स्टार्सशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी मिळणं तसं दुरापास्त .. म्हणूनच अभिनेता अर्शद वारसी ह्या पार्श्वभूमीवर सर्वस्वी भिन्न आहे .. कुछ भी पूछो यार ! असं म्हणत तो ऐसपैस पसरतो .. त्याच्याशी बोलणं हा नेहमीच एक कम्फर्ट फील देणारा अनुभव असतो.
१) अर्शद, या वाढदिवसाचं वेगळेपण काय? काही विशेष प्लॅन्स ?
‘नो प्लॅन्स डियर! मारिया (पत्नी – अभिनेत्री डान्सर, शेफ मारिया गोरेटी) उत्तम शेफ आहेच आणि केक बनवणं तिच्या डाव्या हातचा मळ! घरात असू आम्ही. शॅम्पेन, केक, म्युझिक आणि कुटुंबासमवेत वेळ घालवणं हाच वाढदिवस. सभोवतालची एकूणच परिस्थिती पाहता संपूर्ण जग कोविडमध्ये भरडून गेलंय, किड्यामुंगीसारखी माणसं मरता आहेत. कुणाला मूड आहे वाढदिवस साजरे करण्याचा? नो वे बॉस ! आज तक हम जिंदा है, लेकिन कल किसने देखा है? कसलीही शाश्वती उरली नाहीये.. व्हेरी डिप्रेसिंग आय फील… एनी वेज.. टेल मी युअर क्वेशन्स !
२) अर्शद, पूर्वीचा तू आणि आताचा तू एकूण फिटनेस फार मनावर घेतलेले दिसतंय. नेमकं काय करतोस फिटनेससाठी ?
‘मैंने पिछले १० सालों मे मेरा वजन १२-१३ किलो तक कम कर दिया, इस की एक अहम वजह यह की मेरी हाईट् कम है, ज्यादा वजन होने से मै ज्यादा ठिङ्गा नजर आता हूं ! मी आहे डांसर – कोरिओग्राफर. अनेक शोज इंडियामध्ये आणि विदेशात केलेत. नर्तक अथवा नर्तिकांनी सुडौल बांध्याचे असावे ही मान्यता आहे. मला त्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे ह्या सत्याचा मी कधी विसर पडू देत नाही. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक समीर तिवारीने मला त्यांच्या चंबळ सफारी नामक फिल्मसाठी साइन केले होते, त्याने गंमतीने म्हटलं, अर्शद, तुझी भूमिका चंबळच्या डाकूची असेल, डाकू हे कधीही ओव्हरवेट नसतात, सतत जंगलाच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यावर बसून रॉबरी केल्याने ते तसे स्थूल दिसत नाहीत. दिग्दर्शकाचा शब्द शिरोधार्य मानत मी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत गेलो (अर्शद जोरात हसत सांगतो, ती फिल्म कधी बनलीच नाही! फिल्म शेल्व्ह्ड झाली) माझा फिटनेस मात्र कायम राहिला त्यामुळे.
३) फिटनेससाठी नेमकं काय करतोस ?’
मी किमान अर्धा तास सायकलिंग करतो. सकाळी ६ वाजता मी वर्सोव्याहून थेट बांद्र्यापर्यंत सायकल चालवतो. रहदारी वाढते तशी गर्दीतले चेहरे माझ्यासोबत फोटो सही घेऊ पाहतात, पण मी कुणालाही थारा देत नाही. घरी आल्यावर मध – पाणी लिंबू घेतो आणि मग २ ते ३ बॉइल्ड एग्ज, फ्रुट प्लेट्स घेतो. १ ते दीडला जेवतो, चिकन प्लेट, ब्राऊन ब्रेड, सूप सॅलड घेतो. चार वाजता ग्रीन टी आणि साडे सात – ८ वाजता डिनर. फिश करी, रोटी – मटण किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स एक बाऊल. ११ ते ११ पर्यंत झोपतो… ह्या दिनचर्चेची सवय झाली मला.
४) २ – ३ वर्षांपूर्वी तू आणि मारियामध्ये बेबनाव झाल्याची बातमी होती ह्यात तथ्य किती आणि अफवा किती ह्यावर तूच प्रकाशझोतात टाकावास.
बकवास है सब ! मारिया आणि माझ्यात बेबनाव ह्या खोटया बातम्या कोण पसरवतय? कुठल्याही नॉर्मल पती पत्नीमध्ये जसे वाद विवाद होतात तसे आमच्यात अधूनमधून होत असतात. तिचं म्हणणं, मी मुलांचे फाजील लाड करतो, त्यांना शिस्त लागू देत नाही. मुलांनी बेशिस्तीनं वागलं की तो ठपका ती माझ्यावर ठेवते ! मग मी चिडतो आणि आमचे वाद होतात त्यातून सध्या जवळजवळ वर्षभर नॉर्मल जगणं सगळे विसरूनच गेलेत. मुलांना शाळा नाहीत, बाहेर खेळू शकत नाहीत मग घरात हट्टीपणा करणार ना मुलं! ह्या कारणासाठी नवरा बायको एकमेकांना डिव्होर्स देणार का? आमच्या लग्नाला २२ वर्षे झालीत. मुलं मोठी झालीत. मारिया आणि माझं डान्स करियर एकाच वेळी एकाच ग्रुपपासून सुरु झालं. आम्ही काही वर्षे लिव्ह इन मध्ये होतो, लग्न त्यानंतर झालं. अर्धाधिक जीवन एकत्र काढल्यावर आता विभक्त होण्यासाठी काहीही कारण नाही. माझ्या ‘लो फेज’मध्ये मारियाने मला नेहमीच साथ दिलीये. मारियाचे कुकरी बुक ‘फ्रॉम माय किचन टु युअर्स ‘ह्या पुस्तकाला खूप उत्तम प्रतिसाद लाभला आहे. मारिया मल्टी टॅलेंटेड आहे ह्यात शंकाच नाही, आम्ही एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहोत.
५) तुझ्या कारकिर्दीची कशी सुरुवात झाली? जुन्या आठवणी आज रुंजी घालतात का ?
माझी कौटुंबिक स्थिती फार चांगली नव्हती. शिक्षणदेखील फार उत्तम नव्हतं. डान्स मात्र मी शिकलो, इंग्लिश थिएटरसाठी डान्स शिकवायचो, काही प्लेज केलेत. अशाच डान्स ग्रुपमध्ये माझी आणि मारियाची ओळख झाली. मारिया त्याकाळात नामांकित मॉडेल देखील होती, माझी ‘पहचान’ बनली नव्हती. आमच्या लग्नानंतर माझं फिल्म करियर सुरु झालं, वाढलं. अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने मला जेंव्हा त्यांच्या ‘तेरे मेरे सपने’साठी साइन केलं तेंव्हा मी बेशुद्ध पडतोय का असं वाटलं. माझ्या कमी उंचीमुळे मी हिरो होण्यासाठी लायक नाही अशी माझी भावना होती.
पण तेंव्हा सुरु झालेल्या प्रवासाने मला हिरो ते व्हिलन आणि को – ऍक्टर ते कॉमेडियन अशा विविधतापूर्ण भूमिका पुढच्या टप्प्यावर मिळत गेल्या हे आणखी एक आश्चर्य ! माझा पिंड मूळचा कोरिओग्राफर – डान्सरचा. हे क्षेत्र आर्थिक सुरक्षिततेची हमी देणारं नाही. अनेक कलाकारांनी साईड बिझनेस सुरु केलेत. माझा तसा कुठलाही बिझनेस नाही पण माझं भविष्य मी ‘सिक्युअर्ड’ करून ठेवलंय. नदी – तळ्याकाठी टुमदार घर असावं, तळ्यातील मासे पकडावेत, ते ताजे मासे, रोजचं गरम अन्न खावं. कुटुंबासमवेत छान वेळ घालवावा. अगदी छोटी छोटी साधी स्वप्नं आहेत माझी. मारियाच्या नियोजनामुळे भविष्य सेफ झालंय. उत्तम भूमिका कराव्यात अशी मात्र इच्छा आहे. कृतज्ञ मी – कृतार्थ मी!
६) ‘मुन्नाभाई एम बी बी एस च्या यशानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ह्या ‘फ्रेंचायजीचं काय झालं? राजू हिरानी मुन्नाभाईचे आणखी सिक्वेल्स काढणार होते, त्याचं पुढे काय झालं?
‘संजुबाबा (संजय दत्त) तुरुंगात गेल्यानंतर काही न काही कारणांनी ‘मुन्नाभाई सिक्वेल्स ‘रखडत गेलेत. गेल्या वर्षी संजूला कॅन्सर झाला आणि पुन्हा सुरु होणारे शूटिंग रखडलं, बेमुद्दत काळासाठी. खुदा ही मालिक है अब ! तरीही मी आशावादी आहे. मुन्नाभाई सिक्वेल्स लवकरच सुरु होतील. सुभाष कपूर यांच्याकडे मुन्नाभाई फिल्मच्या सिक्वेल्सची सूत्रं दिल्याचे मला समजले. होपिंग फॉर द बेस्ट’
७) ‘पीके’सारखा सुपर डुपर हिट सिनेमा हातचा गेल्याची रुखरुख कधी वाटली नाही का?
‘हो सुरुवातीला वाटली न! राजू हिरानी यांच्या फिल्ममधे काम करण्याची संधी कोण सोडेल? त्यांनी मला साइन केले पण शूटिंगच्या तारखा माझ्या ‘देढ इश्किया’ फिल्मच्या डेट्सशी क्लॅश होत होत्या त्यामुळे मला नाईलाजाने ‘पीके’फिल्मवर पाणी सोडावे लागले. ‘देढ इश्किया’मध्ये मी फिल्मचा हिरो होतो, नसिरूउद्दिन शाह, माधुरी दीक्षितसारखे कसलेले जेष्ठ सहकलाकार सोबत होते, आणि मुख्य म्हणजे मी ह्या फिल्मसाठी आधीच होकार दिला होता. एथिकली देखील मी ‘देढ इश्किया’ फिल्मला प्राधान्य देणे योग्य होतं. दुर्देवाने ‘पीके’ सिनेमाला बम्पर यश लाभलं तर देढ इश्किया फार चालला नाही !
८) तुझ्या करियरला जवळजवळ २५ वर्षे झालीत. सिनेमाचं यश अथवा अपयश, पुरस्कार तुझ्यासाठी किती महत्वाचे ठरतात?
चित्रपट व्यवसायात सगळंच बेभरवशाचं असतं. ‘हम आपके है कौन’ एका लग्न समारंभाचं शूटिंग आहे, ज्याला कथा नाही असा रिव्ह्यू आल्यानंतरही हा सिनेमा धो धो चालला आणि ह्या फिल्मने सलमानच्या फ्लॉप झालेल्या करियरचं सोनं केलं. ‘शोले’ तद्दन सुमार सिनेमा आहे असं म्हटलं गेलं पण शोले हा सिनेमा ‘माईलस्टोन’ ठरला. मला माझ्या ‘देढ इश्किया’ ‘लिजेंड्स ऑफ मायकल मिश्रा’ खूप आवडेल अशी खात्री होती पण हा सिनेमा नाही चालला. ‘गुड्डू रंगीला’ फिल्म कॉमेडी असल्याने लोकांना खूप आवडेल असं वाटत होतं, पण चालला नाही. जॉली एल एल बी सिनेमा मी केला पण मला अर्थहीन वाटत होता. कोर्ट रूम ड्रामाज फार पसंत केले जात नाहीत अशी माझी भावना असताना ह्या सिनेमाला घवघवीत यश लाभलं. ज्या माझ्या फिल्म्सवर मला खूप उमेद होती ते चालले नाहीत म्हणून नंतरच्या काळात माझ्या कुठल्याही फिल्म्सवर फार होप्स ठेवल्या नाहीत. पुरस्कार मला मिळतील असं तर मला कधी वाटलं नाहीच. ‘मुन्नाभाई’ फिल्मच्या ‘सर्किट’ ह्या भूमिकेने मात्र राजमान्यता – लोकमान्यता मिळवून दिली.
९) बॉलिवूडमध्ये नेपोटिझम अर्थात वंशवाद आहे, स्टारडम लाभलेले स्टार्स नव्या कलावंतांना टिकू देत नाहीत असं चित्र असतं. तुझा काय अनुभव आहे?
सच्ची बोलू तो संजुबाबासारखे स्टार्स नाहीतच. त्याला इगो नाही. संजूला अनेकांनी सांगितलं, म्हटलं तर त्याचे कान भरलेत, सर्किटला तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रियता मिळालीये, सावध हो… पण त्याने ते मनावर घेतलं नाही. मी आता नावं घेत नाही, पण स्टार्सच्या शारीरिक उंचीपेक्षा त्यांच्या इगोजची उंची जास्तच असते! पण गेल्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगत विचारांची आहे असं मला वाटतं. अमित साध हा अभिनेता खूप मनमिळावू आहे त्याला इगो नाही, तो सिनियर्सना आदर देणारा आहे. खूपसे स्टार्स फिल्म्सच्या सेटवर ‘बॅगेज’ घेऊनच येतात. माझ्या पठडीतले आहेत. बाकी न बोललं बरं! मला नकारात्मक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक बाबींवर बोलणं योग्य वाटेल. ह्या इंडस्ट्रीने मला पैसा, वर्ल्ड ट्रिप, मानमरातब, पुरस्कार सगळं काही दिलं, मी माझ्या अभिनय व्यवसायाचा ऋणी आहे.
१०) हिंदी फिल्मचं दिग्दर्शन आता सिनियॉरिटी लाभल्यावर करावंसं वाटतं का?
हो दिग्दर्शन करण्याचा विचार आहे, पण पुढील ३-४ वर्षात… सध्या अभिनयाची कारकीर्द मी एन्जॉय करतोय.
=====
हे देखील वाचा: सर्किट नसता तर मुन्ना हा मुन्नाभाई झालाच नसता.
=====