Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Ankita Lokhande झाली बेरोजगार? स्वतः सांगितलं काम न मिळण्याचे कारण…
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता या मालिकेतून इंडस्ट्रीत यश मिळालं. यानंतर तिला ला इंडस्ट्रीत बरीच काम मिळू लागली. पण कंगना राणावतच्या मणिकर्णिका या सिनेमानंतर अंकिता कोणत्याच नव्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना दिसली नाही. तिला कोणत्याही चित्रपटत पाहिल गेले नाही. त्यामुळे अंकिता नेमकी कोणत्या कामत एवढी बिझी आहे? तिने सिनेसृष्टीत काम करण सोडलं का असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते. पण आता या प्रश्नाच उत्तर स्वतः अंकिताने दिले आहे.(Actress Ankita Lokhande)

अंकिताने नुकतीच एका वेबसाइट ला मुलाखत दिली आणि यावेळी ती प्रेक्षकांना काम करताना कुठे का दिसत नाहीये याच उत्तर दिल. या मुलखतीमध्ये अंकिताला तिच्या खाजगी आणि व्यावसायिक गोष्टींबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि तिने ही त्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तर दिली. ”मणिकर्णिकानंतर मला कोणत्याही कामाच्या ऑफर्स आल्या नाहीत. खरं सांगायचं तर मला माहित आहे की मी खूप टैलेंटेड आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी माझा कोणी गॉड फादर नाही” अस ती म्हणाली. पुढे तिला कामाच्या ऑफर्स नकारण्याबद्दल ही प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली की, ”ही इंडस्ट्री खुप वेगळी आहे. अनेक कलाकार म्हणतात की आम्हाला चांगल्या ऑफर्स मिळाल्या नाही, पण मला तर नाकारण्यासाठी पण कोणत्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. आणि मी त्या अभिनेत्रींपैकी नाही जिथे मी स्वतः जाऊन काम मागेल”.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने २०१९ साली कंगना रणावतच्या मनकर्णिका या सिनेमातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केल. मात्र तिचा हां सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू करू शकला नाही. त्यानंतर ती २०२१ साली अंकिताने तिचा बॉयफ्रेंड आणि बिजनेसमॅन विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधली. अंकिता भले ही मलिका किंवा सिनेमात दिसत नसेल मात्र ती सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. (Actress Ankita Lokhande)
===============
हे देखील वाचा: रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….
==============
सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या प्रकारणानंतर अंकिता बरीच चर्चेत आली होती. सुशांत आणि अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले होते, ही मालिका प्रचंड प्रसिद्धीस आली होती, याच महिलेच्या सेट वर सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघे जवळपास ६ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर ते विभक्त झाले.