दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नानीचा दसरा सुपरहिट…
दाक्षिणात्य सुपरस्टार नानी याचा दसरा (Dasara movie) हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. नानीच्या या दसराची एवढी क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती की, अनेक ठिकाणी पहाटे पाच पासून या चित्रपटाचे शो सुरु झाले. नानी यांनी या चित्रपटात तेलंगणातील गोदावरी खाणीजवळील सिंगरेनी कोळसा खाणीमध्ये काम करणा-या युवकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटातील गाणीही आधीच हिट ठरली आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात नानीच्या प्रत्येक गाण्यावर आणि त्याच्या डायलॉगवर शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडताना दिसत आहे. तसे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होत असून दसरा (Dasara movie) हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार अशी खात्रीच प्रेक्षकांनी दिली. बाहुबलीचाही रेकॉर्ड दसरा मोडणार असे चित्र असून दसराचे आगामी सर्व शो हाऊसफुल झाले आहेत.
नानीचा बहुप्रतीक्षीत ‘दसरा’ (Dasara movie) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि सर्व चित्रपटगृहांचे चित्रच पलटले आहे. प्रेक्षक अक्षरशः नाचत आहेत आणि नानीच्या नावानं शिट्या मारत असल्याचे दृश्य बहुतेक चित्रपटगृहात आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ निर्माण केली होती. नानीचे चाहते चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली असून पहिल्याच दिवशी या चित्रपटानं करोडोच्या घरात कमाई केली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार नानीच्या या दसरा चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दसरा (Dasara movie) हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. दसरा चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी नानीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून दसराची घोषणाच केली आहे. दसरा चित्रपट पाहिल्यानंतर एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, ‘दसरा (Dasara movie) हा चित्रपट एक अप्रतिम चित्रपट आहे. पण त्याचा क्लायमॅक्स अपेक्षेपेक्षा जास्त आहे. अन्य एका प्रेक्षकांना कमेंट करताना लिहिले आहे की, ‘काय अप्रतिम चित्रपट आहे, अरे भाऊ… मिस्टर नानी एकदम आग आहेत.’ एका चाहत्याने व्हिडीओ शेअर करताना थिएटरमधील स्थिती दाखवली आहे. अनेक प्रेक्षक नानीची एन्ट्री झाल्यावर आणि गाण्यावर नाचताना या व्हिडिओमधून दिसत आहेत. दसरा चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, नानी आणि कीर्तीच्या ‘दसरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 17 कोटींची कमाई केली आहे. या बंपर ओपनिंगनंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. वीकेंडला हा चित्रपट कमाईच्या बाबतीत दुहेरी धमाका करू शकतो, असा अंदाज आहे. ‘दसरा’मध्ये नानीसोबत कीर्ती सुरेश, दीक्षित शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी गाजलेल्या या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाले आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा चित्रपट 1300 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला. अनेक चित्रपटगृहांमध्ये आगाऊ बुकिंग करून चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले आहेत, अशा परिस्थितीत निर्माते आणखी शो जोडण्याचा विचार करत आहेत. हा चित्रपट नानीच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरणार अशी अपेक्षा आहे. ‘बाहुबली’, ‘आरआर’ किंवा ‘केजीएफ चॅप्टर 1 आणि 2’ सारख्या दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टरचे रेकॉर्ड तोडण्यात आता नानीचा हा दसरा यशस्वी होतो का हे पाहणे उत्सुकतेचे असेल. आता नानीचा हा दसरा (Dasara movie) चित्रपट गृहात पहाटे पाच वाजल्यापासून दाखवण्यात येत आहे. हे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत, हे विशेष.
श्रीकांत ओडेला लिखित आणि दिग्दर्शित, ‘दसरा’ या चित्रपटाची कथा सिंगरेनी येथील कोळसा खाणींची सामाजिक-आर्थिक स्थिती, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता संघर्षावर आधारित आहे. ‘हिट’, ‘जर्सी’, ‘मख्खी’, ‘पैसा’ यांसारख्या चित्रपटांमधून नानीने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता त्यात दसरा या चित्रपटाचे नाव सामिल होणार आहे. ‘दसरा’ तेलुगुबरोबरच तमिळ, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
=======
हे देखील वाचा : Ps 2 चा ट्रेलरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा वाढली…
=======
चित्रपटाची कथा एका तरुणाभोवती आहे. 1995 मध्ये, धारणी हा वीरलापल्ली येथील तरुण त्याच्या आजीसोबत राहतो आणि त्याचा बहुतेक वेळ त्याच्या जिवलग मित्र, सुरी आणि वेनेला यांच्यासोबत घालवतो. धरणी याला वेनेला ही त्याची बालमैत्रिण आवडत असते. पण वेनेला हिला सुरी आवडत असतो. वेनेलाच्या प्रेमापोटी तो तिचे आणि सुरीचे लग्न करण्यासाठी पुढाकार घेतो. मात्र, गावातील राजकारणामुळे या तिघांच्या आयुष्यावर परिणाम होतो. वेनेला आणि सुरी याच्या लग्नाच्या दिवशीच सुरीची रहस्यमयरीत्या हत्या होते. मग आपल्या मित्राच्या हत्येचा सूड घेण्यासाठी धरणी काय काय करतो हे दसरामध्येच पहाण्यासारखे आहे. श्रीकांत ओडेला यांनी आपल्या शैलीमध्ये दसराचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी ओडेला यांनी नान्नाकू प्रेमथो आणि रंगस्थलममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. दसरा प्रदर्शित होण्यापूर्वीच “धूम धाम धोशान” “ओरी वारी” “चमकीला अंजीलेसी” “ओह अम्मालालो अम्मालालो” ही त्यातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. दसराचे डिजिटल हक्कही मोठी रक्कम देऊन नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. नानी आणि किर्तीच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि हा दसरा पाहावा असाच आहे.