ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अखेर पार पडणार भूमी-आकाशचा ‘शुभविवाह’!
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह‘ ही मालिका खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या आवडीची मालिका झाली आहे. त्यातील कलाकार, त्यांचा अभिनय आणि वेगळा विषय या सगळ्यांमुळे ही मालिका दिवसेंदिवस वेगवगळ्या ट्विस्ट ने पुढे सरकत आहे. या मालिकेत सध्या खुप महत्वाचा ट्रॅक सुरु आहे. जिथे भूमी आणि आकाश कायमचे एकमेकांचे होणार आहेत. सायकल राणी म्हणता म्हणता आता भूमी आता आकाशची पत्नी होणार आहे.(Shubhvivah Marathi Serial)
खरतर दोघांचा हा विवाहसोहळा विलक्षण असणार आहे. बहिणीच्या सुखासाठी भूमीने आपला आनंद बाजूला सारत मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मनात हुरहुर असली तरी आकाशला पावलापावलावर साथ देण्याचं वचन भूमीने त्याला दिलं आहे. म्हणूनच आकाश आणि भूमीचा हा शुभविवाह खास असणार आहे. दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असली तरी हा प्रवास वाटतो तितका सुखकर नक्कीच नाही. मेहंदी समारंभातही आकाशची फजिती होताना पाहून भूमीने पुढाकार घेत त्याचा मान राखला. हळदीच्या दिवशी ही काहीसा असाच प्रसंग घडला. मात्र देवीच्या साक्षीने दोघांनाही हळद लागली. लग्नाच्या दिवशीही आगीची भीती वाटत असल्यामुळे आकाश सात फेरे घेण्यास नकार देणार आहे. मात्र लहान मुलाप्रमाणे आकाशची समजून काढून भूमी त्याला फेरे घेण्यासाठी तयार करते.(Shubhvivah Marathi Serial)
अनेक आव्हानांचा सामना करत भूमी-आकाशला एकमेकांची साथ द्यायची आहे. आकाशला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भूमी अखंड प्रयत्न करणार आहे. मात्र खरा ट्विस्ट भूमी आणि आकाशच्या लग्नानंतर येणार आहे. आकाश आणि भुमीचा संसार नेमका कसा होणार? भुमीची सावत्र बहिण तिच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण करणार का? म्हणजे आकाश ची आत्या भुमीचा वापर कसा करुन घेणार हे पाहणं खुप तेवढच महत्वाच असणार आहे. आणि येणाऱ्या भागात आपल्याला सगळ पहायला मिळणार आहे.
===========================
हे देखील वाचा: भाऊ-ओंकार एकत्र इलो ! “करून गेलो गांव” पुन्हा नव्याने रंगभूमीवर
===========================
नव्या वर्षात म्हणजेच १६ जानेवारीपासून शुभविवाह ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली . बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. या मालिकेच्या निमित्ताने मधुरा देशपांडे हिने अनेक वर्षांनी मालिका विश्वात पदार्पण केलं. त्या बरोबर तब्बल १२ वर्षांनी विशाखा सुभेदार यांनी ही मालिकांमध्ये एंट्री केली आहे.