Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधून स्मृती इराणींचं कमबॅक; एका

‘लपंडाव’ मालिकेतून Rupali Bhosale चा दमदार कमबॅक; साकरणार महत्वाचे पात्र !

Bazaar Movie : ……करोगो याद तो हर बात याद आयेगी!

Jab We Met : मुसळधार पाऊस आणि रिअल लोकेशन्सवर शुट

Bollywood News : “मी धार्मिक नाही तर…, गायत्री मंत्रामुळे मला…”;मुस्लिम

Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग

Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

या कारणामुळे हेमा मालिनीने बी ग्रेड सी ग्रेड सिनेमे स्वीकारले!

 या कारणामुळे हेमा मालिनीने बी ग्रेड सी ग्रेड सिनेमे स्वीकारले!
बात पुरानी बडी सुहानी

या कारणामुळे हेमा मालिनीने बी ग्रेड सी ग्रेड सिनेमे स्वीकारले!

by धनंजय कुलकर्णी 03/05/2023

अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदा झळकली ती शोमन राजकपूर सोबत. चित्रपट होता ‘सपनों का सौदागर’. हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या जरी चालला नाही तरी हेमा मालिनी (Hema Malini) मात्र सर्वांना पसंत पडली. तिचं देखणं सौंदर्य, तिचा किलिंग लूक, तिचा पडद्यावरील अपिअरन्स सर्वांना खुश करून गेला. सत्तरच्या दशकांमधली ती आघाडीची अभिनेत्री ठरली. लोकप्रिय चित्रपटांच्या सोबतच तिने तिच्या अभिनयाने नटलेल्या कलात्मक भूमिका साकारून समीक्षकांची वाहवा मिळवली. गुलजार यांची ती एकेकाळी आवडती अभिनेत्री होती. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस तिने अभिनेता धर्मेंद्र सोबत लग्न केले. लग्नापूर्वीची धरम – हेमा हे हिट पेअर. पण लग्नानंतर मात्र फारशी यशस्वी ठरली नाही. आपल्याकडे  लग्नानंतरच एकंदरीतच अभिनेत्रींच्या यशाला मर्यादा येऊ लागतात. त्यामुळे हेमा मालिनीला (Hema Malini) देखील चित्रपट मिळणे कमी होऊ लागले.

या काळात चित्रपटांचा ट्रेंड देखील बदलत होता. याच काळामध्ये हेमा मालिनीवर (Hema Malini) आणखी एक संकट कोसळले. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तिच्यावर चक्क एक कोटी रुपयांचा दंड लावला कारण तिचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट अतिशय गलथान पणे काम करून आयकर खात्याची फसवणूक केली होती. आयकर खात्याने सर्व चौकशी करून कर चुकवेगिरी बद्दल हेमा मालिनीला (Hema Malini) एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम भरायला सांगितली होती. एक कोटी ही रक्कम त्या काळात फार मोठी होती त्यामुळे हेमा मालिनीचे धाबे  दणाणले. एकतर तिच्या वडिलांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले होते. मोठा भाऊ कलकत्त्याला निघून गेला होता. त्यामुळे तिला घरून अशी साथ कुणाचीच नव्हती. तिने इन्कम टॅक्स च्या सर्व फायली मद्रास हून मुंबईला शिफ्ट करून घेतल्या. पी एन शहा आणि सुनील गुप्ता या नामवंत सी ए कडे हे काम सोपवले. त्यांनी केसचा अभ्यास करून हेमाला सांगितले,” हे प्रकरण आता हाताच्या बाहेर गेले आहे ते निस्तरण्यात वेळ, पैसा आणि ताकद घालविण्यापेक्षा सरळ सवलत आणि कालावधी मागून दंड भरून मोकळे व्हावे!” हेमा  स्वाभिमानी होती की, तिने धर्मेंद्रकडे याबाबत एक पैसा देखील मागितला नाही आणि जिद्दीने तिने पैसा गोळा करायला सुरुवात केली. परंतु तिच्या असे लक्षात आले की, चित्रपटातील तिची मागणी आता दिवसेंदिवस कमी होत होती. 

त्यामुळे तिने मोठा निर्णय घेतला. तिने बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करायचे ठरवले. या सिनेमांना भारतातील निम शहरी ग्रामीण भागामध्ये चांगला प्रेक्षक वर्ग असतो. यात्रामध्ये या सिनेमांना गर्दी होत असते. झोपडपट्टी असलेल्या थिएटरमध्ये असले चित्रपट प्रचंड चालतात. श्याम रल्ह्न यांचा ‘रामकली’ नावाच्या चित्रपटात हेमा चक्क एक डाकू बनली होती. डाकू बनवून ती सूड घेताना दाखवली होती. हातात पिस्तूल घेतलेली डाकूच्या विषयातील हेमा मालिनी हे पोस्टर पाहून तिच्या काळजात धस्स झाले कारण एकेकाळी दर्जेदार सिनेमांमध्ये काम करणारी हेमा मालिनी (Hema Malini) हीच आहे का? असं तिचं तिलाच पटत नव्हतं. पण काही इलाज होता. या चित्रपटात तिचा नायक शत्रुघ्न  सिन्हा आणि सुरेश ओबेरॉय होता. हेमाचा यात डबल रोल होता हा सिनेमा शहरात जरी अजिबात चालला नसला तरी दूर दूरच्या ग्रामीण भागात आणि हिंदी बेल्ट मध्ये हा प्रचंड यशस्वी झाला. मग अशा सिनेमांची डिमांड हेमामालिनी कडे होऊ लागली आणि तिने पुढचा सिनेमा स्वीकारला ‘दुर्गा’ यात देखील ती ॲक्शन क्वीन बनली. बी सुभाष यांच्या ‘आंधी तूफान’ या चित्रपटात तिने फ्री स्टाईल मारामारी केली.

=====

हे देखील वाचा : ‘हा’ सिनेमा जयदेव यांच्या हातातून कसा गेला?

=====

आता हेमा मालिनीने (Hema Malini) आपल्या चित्रपटांचा जॉनर टोटली बदलला होता आणि मारधाड बी आणि सी ग्रेडचे सिनेमे ती सहज स्वीकारत होती. कारण यातून तिला मुबलक पैसे मिळत होते आणि यातून ती आयकर खात्याचा दंड लवकर भरू शकत होती. डिस्ट्रीब्युटर्सला फक्त तिने हे सिनेमे शहरात प्रदर्शित केले तरी उपनगरात प्रदर्शित करा अशी विनंती केली काही करून तिला तिचा ओरिजनल प्रेक्षक वर्ग गमवायचा नव्हता. तिने ही केलेली तडजोड होते तिला अशा प्रकारच्या भूमिका करायला मनापासून आवडत नव्हते परंतु परिस्थिती अशी होती की, तिला ठराविक काळामध्ये रक्कम उभी करायची होती. तब्बल सात-आठ वर्षे हेमा मालिनी अश्या प्रकारच्या भूमिका करू लागली. याच काळात तिने देश-विदेशात भरतनाट्यमचे प्रयोग सुरू केले अशा प्रकारे तिने दहा वर्षात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची सर्व रक्कम भरून टाकली आणि फाईल एकदाची क्लोज करून टाकली. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 1
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 1
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment Featured Hema Malini
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.