ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
प्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या एका लाइव्ह इव्हेंटदरम्यान असं काही घडलं ज्याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. अलीकडेच ए. आर. रेहमान यांचा मेगा कॉन्सर्ट पोलिसांनी मध्येच थांबवल्याने त्यांचे चाहते संतापलेले पहायला मिळाले. रविवारी पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेत राजबहादूर मिल्सजवळील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या ए. आर. रेहमान यांच्या कॉन्सर्टला रोखले आणि रहमानच्या टॉप ट्यून्सवर हजारो चाहते थिरकण्यासाठी आले होते.(A R Rahman Live Concert)
ए. आर. रेहमान यांच्या या लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कॉन्सर्ट पुण्यात होती जिथे व्हिडिओमध्ये ए आर रेहमान आपल्या चाहत्यांसमोर परफॉर्म करताना दिसत आहे. ए. आर. रेहमान हे त्यांचे आवडते गाणे ऐकून त्यांचे चाहतेही खूप खूश होते आणि उत्सुक ही होते. दरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, अचानक पोलीस स्टेजवर पोहोचतात आणि शो थांबवण्यास सांगतात. खरं तर १० वाजले होते आणि गायकाची ही कॉन्सर्ट १० वाजल्यानंतरही सुरू होती, ज्याला परवानगी नाही. पुणे पोलीस स्टेजवर येतात आणि ए. आर. रेहमान यांना शो थांबवण्याची सूचना देतात. ए. आर. रेहमान यांनी पोलिसांच्या सांगण्यावरून शो बंद करण्याची घोषणा करतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, पोलीस अधिकारी संतापलेले दिसत आहेत आणि गायकाला इशारे करून शो थांबवायला सांगत आहेत.
रात्री १० वाजता एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयोजकांना कार्यक्रम निर्धारित वेळेपेक्षा जास्त असल्याने तो तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. रेहमान त्यांचे सुपरहिट गाणे, चल छाया, छाया गात होता, एका पोलिसाने थेट त्याच्याकडे जाऊन घड्याळाकडे बोट दाखवून शो संपवण्यास सांगितले. पण संगीतकाराने या सूचनेकडे दुर्लक्ष करून मैफल सुरू ठेवली, संतापलेल्या अधिकाऱ्याने त्यातील एकाकडे जाऊन ते न संपल्यास कडक कारवाई करू, असा इशारा सुद्धा दिला. (A R Rahman Live Concert)
=======================================
हे देखील वाचा: लाखांची गाडी सोडून सारा अली खान ने केला चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास !
=======================================
‘रोजा’ (१९९२) या चित्रपटात आपल्या अप्रतिम सूरांनी प्रसिद्धी मिळवलेला रेहमान पोलिसांच्या सुचनेनंतर स्वत: स्टेजवरून उतरला आणि कुठलाही गदारोळ किंवा भाष्य न करता शांतपणे गेला. जमाव आपली नाराजी व्यक्त करत राहिला, पण म्युझिक कॉन्सर्ट संपला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी स्टेजवर आयोजकांशी बोलताना दिसत आहेत.