
याचं भन्नाट कल्पनेमुळे ‘मिस्टर इंडिया’ ठरला हिट
माणसाला अदृश्य होता आलं पाहिजे ही इच्छा अनादी काळापासून आहे. त्यावर विज्ञानामध्ये अजूनही खूप संशोधन चालू आहे. पण अजूनही याला यश आलेलं नाही. आपल्या हिंदी सिनेमांमध्ये मात्र हा कॉन्सेप्ट खूप आधीपासून आहे. हिरोने अदृश्य होऊन केलेली धमाल या थीमवर अनेक चित्रपट आले. सलीम जावेद यांनी एकत्रित केलेला शेवटचा प्रोजेक्ट म्हणजे ‘मिस्टर इंडिया’ (१९८८) हा चित्रपट देखील याच थीमवर होता. मूळात माणसाने गायब होणे हीच मोठी भन्नाट कल्पना आहे, त्यामुळे ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते. परंतु ‘मिस्टर इंडिया’ हा काही या थीम वरचा पहिलाच चित्रपट नव्हता. या कन्सेप्टवर याच्या आधी देखील बरेचसे सिनेमे येऊन गेले होते. परंतु ते फारसे यशस्वी न झाल्याने विसरले गेले. १९५७ साली नानुभाई भट (महेश भट आणि मुकेश भट यांचे वडील) यांनी अशोक कुमार यांना घेऊन पहिल्यांदा या थीम वरचा चित्रपट काढला होता. चित्रपट होता ‘मिस्टर एक्स’ या सिनेमाची कथा अशोक कुमारला देखील खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्याने लगेच सिनेमाला होकार दिला. (Super Hit)

यात त्यांच्या सोबत नलीनी जयवंत आणि प्राण हे कलाकार होते. पण त्याच्या असे लक्षात आले की, जर नायक सिनेमातून गायब असेल तर त्याला मानधन खूप कमी मिळेल त्यामुळे त्याने पर डे दोन हजार रुपये असे मानधन नानूभाई भट यांना सांगितले. नानूभाई भट त्यांच्या पेक्षा हुशार! त्यांनी फक्त दोन दिवस अशोक कुमार यांना बोलावून चित्रीकरण केले. पहिल्या दिवशी अशोक कुमार एक रसायन पिऊन गायब होतो अदृश्य होतो आणि दुसऱ्या दिवशी तेच रसायन पुन्हा दिसू लागतो. मधल्या काळात अशोक कुमारच्या बॉडी डबलला घेऊन त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले. अशोक कुमारला या संपूर्ण सिनेमासाठी फक्त चार हजार रुपये मानधन मिळाले! अशोक कुमारने सांगितलेली अटच त्याला आडवी आली!! (Super Hit)
अर्थात चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही. यानंतर १९६४ साली याच थीमवर ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ हा चित्रपट आला. यात किशोर कुमार अदृश्य होत असतो. हा चित्रपट त्याकाळी बरा चालला. या चित्रपटातील एक गाणे आज देखील प्रचंड हिट ठरले. किशोर कुमार हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. गाण्याचे बोल होते ‘मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी.’ या सिनेमात किशोरची नायिका कुमकुम होती. यातील ‘खूबसुरत हसीना जानेमन जाने जा ..’ हे गाणे देखील होते, सिनेमाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. (Super Hit)

या चित्रपटाचे यश पाहून नंतर पुन्हा एकदा नानूभाई भट यांना याच विषयावर सिनेमा करावासा वाटला. त्यांनी पुन्हा अशोक कुमारला गळ घातली आणि सिनेमाचा नायक बनवले. यावेळी अशोक कुमारची नायिका रागिनी होती. सिनेमाच्या नाव होते ‘आधी रात के बाद’ हा सिनेमा देखील फारसा चालला नाही. यानंतर १९७१ साली के रमनलाल यांनी याच संकल्पनेवर एक सायन्स फिक्शन सिनेमा बनवला ‘ऐलान’. विनोद मेहरा, रेखा आणि विनोद खन्ना यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातील नायक विनोद मेहरा एक अंगठी घातल्यानंतर गायब होत असतो. (या चित्रपटात रेखा तिचे स्मार्ट वॉच कम्युनिकेशन साठी वापरत असते. हा कन्सेप्ट आज पन्नास वर्षानंतर आपण प्रत्यक्षात पाहत आहोत! आपला हिंदी सिनेमा काळाच्या किती पुढे होता!) यात अंगठी बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची एकच गट असते अंगठी घालण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपले पूर्ण कपडे काढून टाकावे आणि नंतरच अंगठी घालावी! प्रेक्षकांना हा खूपच थिल्लर पणा वाटला आणि चित्रपटाचेच वस्त्रहरण झाले! या सिनेमातील भूमिकेसाठी रेखाला फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. यानंतर पुढचे पंधरा-सोळा वर्षे कोणीही या थीमवर चित्रपट काढण्याचे धाडस केले नाही.(Super Hit)
ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र शेखर कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट सलीम जावेद यांनी एकत्र केलेला शेवटचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर ही जोडी ऑफिशियल विभक्त झाली. हा सिनेमा जबरदस्त हिट झाला. यात पूर्वीच्या सिनेमाप्रमाणे गायब होण्यासाठी कोणतेही रसायन नव्हते तर एक मॅजिकल वॉच होते. जे हातात घातले की, नायक गायब होत असे. लहान मुलांना हा सिनेमा प्रचंड आवडला. या सिनेमाने अनेक विक्रम केले. श्रीदेवी आणि अनिल कपूरचा सर्वाधिक यशस्वी हा सिनेमा होता. या ‘मिस्टर इंडिया’ चे आधीच्या गायब होणाऱ्या सिनेमा सोबतचे काही कनेक्शन देखील होते. या थीम वरील पहिला चित्रपट मि. एक्सचा नायक अशोक कुमार होता. (Super Hit)
======
हे देखील वाचा : साठच्या दशकातील सर्वांग सुंदर रोमँटिक संगीतमय चित्रपट ‘आरजू’
======
मिस्टर इंडिया मध्ये देखील अशोक कुमारची महत्वाची प्रोफेसरची भूमिका होती. मिस्टर इंडिया चित्रपटातील अनिल कपूर वर चित्रित सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. हा किशोर कुमार मिस्टर एक्स इन बॉम्बेचा नायक होता. ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या दोन्ही चित्रपटांचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ आणि ‘ऐलान’ या दोन्ही सिनेमांचा खलनायक मदनपुरी च होता. ‘मिस्टर इंडिया’ चा इम्पॅक्ट खूप वर्ष भारतीय सिनेमावर होता. त्यामुळे या थीमवर चित्रपट काढण्याचे धाडस कोणी केले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी तुषार कपूर याचा ‘गायब’ नावाचा चित्रपट आला होता पण या सिनेमाला अजिबात यश मिळाले नाही. २०१५ साली इम्रान हाश्मीला घेऊन मुकेश भट यांनी ‘मिस्टर एक्स’ नावाचा याच थीम वरील चित्रपट काढला होता. मुकेश भट हे नानूभाई भट यांचे चिरंजीव. १९५७ साली नानूभाई भट यांनी या सिरीज मधील पहिला चित्रपट काढला होता. २०१५ साली त्यांच्या मुलाने त्याच नावाने त्याच थीमवर चित्रपट काढून एक वर्तुळ पूर्ण केले. खर तर आता या सिनेमात भरपूर व्हिज्युअल इफेक्ट टाकता आले. Power of invisibility, and become a vigilante खूप प्रभावी पणे दाखवता आले असते पण ते जमले नाही त्यामुळे या सिनेमाला देखील अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही!