Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Big Boss 19: सलमान खानशिवाय होणार वीकेंड का वार; ‘हा’

Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का

Saiyaara आता OTT गाजवणार!

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये

चला Mehboob Studio मध्ये…

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वैदेही परशुरामी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चं सूत्रसंचालन

 वैदेही परशुरामी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चं सूत्रसंचालन
kalakruti-vaidehi-parshurami-to-host-mi-honar-superstar-chote-ustaad-season-two-marathi-info/
टीव्ही वाले मिक्स मसाला

वैदेही परशुरामी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चं सूत्रसंचालन

by शुभांगी साळवे 29/05/2023

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले ४ ते १४ या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धक म्हणजेच शुद्धी, सायली, सार्थक, सिद्धांत आणि स्वरा या पर्वात छोट्या उस्तादांना आपल्या सुरांची साथ देणार आहेत. सुरांचा दरबार हे यंदाच्या पर्वाची खास थीम असल्यामुळे कार्यक्रमातील भव्यता प्रेक्षकांना प्रोमोपासूनच अनुभवायला मिळणार आहे. (Vaidehi Parshurami)

Vaidehi Parshurami
Vaidehi Parshurami

आता दूसरा सीजन मध्ये सूत्रसंचालन कोण करणार याचा प्रेक्षक अंदाज लावत होते अखेर त्या अभिनेत्रीच नाव आता समोर आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी यंदाच्या पर्वाच सूत्रसंचालन करणार आहे. सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, ‘एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्ताद च्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचं टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला, याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे, ज्या पद्धतीचं टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होतं. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे. सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे कारण इथे प्रसंगावधान राखावं लागतं. लहान मुलांसोबत जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. 

Vaidehi Parshurami
Vaidehi Parshurami

वैदेही पुढे अस ही म्हणाली, मला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यामुळे या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली, प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. सूत्रसंचालन ही कला आहे, स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना वैदेहीने व्यक्त केली. (Vaidehi Parshurami)

================================

हे देखील वाचा: अखेर प्रतिक्षा संपली ! अर्शद वारसीच्या ‘असुर 2 ‘ चा धमाकेदार फर्स्ट लुक आला समोर

================================

तेव्हा बच्चे कंपनीच्या सुरांची ही अनोखी मैफल अनुभवण्यासाठी आता आपण ही सज्ज होऊया. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर वाहिनीवर आपल्याला पाहता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 1
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 1
    Share
    Email
Tags: adarsh shinde Entertainment marathi reality show Mi Honar Superstar Chote Ustad Mi Honar Superstar Chote Ustad 2 sachin pilgaonkar Star Pravah Vaidehi Parshurami vaishali samant
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.