दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शम्मीकपूर इजिप्शियन मुलीच्या प्रेमात पडला तेव्हा…
कलावंतांच्या गद्धे पंचशीमधील कथा खूपच इंटरेस्टिंग असतात. अभिनेता शम्मी कपूर तर त्यावेळी फक्त २२ वर्षाचे होते. या वयात ते चक्क एका इजिप्शियन मुलीच्या प्रेमात पडले होते. तिच्या प्रेमात इतके बुडाले होते की, ते तिच्याशी लग्न करायला तयार झाले होते. तसे त्यांनी तिला आपल्या घरच्यांसोबत इंट्रोड्युस देखील केले होते. पण हे लग्न होऊ शकले नाही. शम्मी कपूर मात्र त्या इजिप्शियन मुलीला आयुष्य विसरु शकले नाही. आजच्या भाषेत सांगायचे तर शम्मीची पहिली क्रश असलेली ही मुलगी शम्मी कपूरने आपल्या उतारवयापर्यंत स्मृतीत जतन करून ठेवली होती! काय होता हा किस्सा? कोण होती ती? कुठे भेटली ही इजिप्शियन मुलगी” हा किस्सा आहे १९५३ सालचा. (Shammi Kapoor)
तेव्हा शम्मी कपूर (Shammi Kapoor) नुकतेच चित्रपट सृष्टीत नायकाची भूमिका करण्यासाठी आले होते. तोवर खरा त्यांचा वावर त्यावेळेस रंगभूमीवरच जास्त होता. त्या वर्षी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय चित्रपट कलावंतांची एक टीम श्रीलंकेला पाठवली होती. त्यावेळी श्रीलंका देशाचे नाव सिलोन होते. भारत आणि सिलोन या दोन्ही देशांमध्ये क्रिकेटची जबरदस्त हवा होती. त्यामुळे भारतीय चित्रपट कलावंतांची एक क्रिकेटची टीम श्रीलंकेमध्ये गेले होते. या टीममध्ये दिलीप कुमार, राजकपूर, प्राण, बेगमपारा, नर्गिस, शम्मी कपूर, प्रेमनाथ असे कलाकार होते. दिवसभर त्यांच्या मॅचेस चालत आणि संध्याकाळी ते कोलंबो मधील एका हॉटेलमध्ये कॅब्रे डान्स पाहायला जात! तिथे कॅब्रे डान्स करणारी एक इजिप्शियन मुलगी शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांना फार आवडली.
इतकी आवडली की, ते तिच्या चक्क प्रेमातच पडले! आणि पुढचे दोन-तीन दिवस ते रोज तिचा डान्स पाहिला हॉटेलमध्ये जाऊ लागले नंतर तिच्याशी ओळख करून घेतली. तिला सांगितले मी कपूर फॅमिली मधून असून कलावंत आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे! त्यावरती हसू लागली. कारण त्यावेळी त्या मुलीचे वय फक्त सतरा वर्ष होते आणि शम्मी कपूर २२ वर्षाचा! पण शम्मी कपूर तिच्या सौंदर्याने पुरते घायाळ झाले होते आणि त्यांना तिच्याशीच लग्न करायचे होते. कोवळ्या वयातील पहिलं हळवं प्रेम होतं ते!
नंतर या कलावंतांची टीम मुंबईला परत आली तरी तो तिच्या संपर्कातच होताच. सिलोन हून कैरोला जाताना ती मुद्दाम मुंबईला उतरली, शम्मीला भेटण्यासाठी. शम्मी कपूरने तिला आणि तिच्या आईला ताज हॉटेलमध्ये जेवायला बोलावले आणि पुन्हा एकदा तिला प्रपोज केले. तो दिवस होता २२ मार्च १९५३! त्याच दिवशी संध्याकाळी राजकपूरच्या ‘आह’ या चित्रपटाचा प्रीमियर लिबर्टी या चित्रपटामध्ये होता. तिथे देखील शम्मी कपूरने (Shammi Kapoor) त्या मुलीला आणि तिच्या आईला इन्व्हाईट केले. या प्रीमियरला शम्मी कपूरने त्या मुलीची आपल्या फॅमिलीसोबत ओळख करून दिली आणि आपल्या आजोबांना डोळा मिचकावून सांगितले कदाचित ही कपूर खानदानची बहु असू शकेल! त्या मुलीचा कैरोला जाण्याचा दिवस उजाडला.
======
हे देखील वाचा : ‘बचना ऐ हसीनो’ या गाण्याचे किशोर कुमारचे फॅमिली कनेक्शन
======
शम्मी तिला सोडवायला एअरपोर्टवर केला. तिथे दोघांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. तेव्हा तिने सांगितले की,” शम्मी, आपण दोघे आता लहान आहोत. आणखी पाच वर्ष थांबूयात. पाच वर्षानंतर जर तुझं माझ्यावर आजच्या इतकच प्रेम असेल आणि माझं सुद्धा तुझ्यावर आजच्या इतकेच प्रेम असेल तर नक्कीच आपण लग्न करू!” त्यावर शम्मी कपूर म्हणाला,” माझं तर नक्कीच तुझ्यावर प्रेम असणार‘. ती म्हणाली,” नक्कीच, माझं देखील असेल! आपण पाच वर्षानंतर लग्न (Shammi Kapoor) रू.” असे म्हणून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. सुरुवातीला आठवड्याला पत्रे पाठविण्याचा सिलसिला कमी होत गेला. पुढे दोघेही आपापल्या व्यवसायात गर्क झाले आणि हळूहळू एकमेकांना विसरत जाऊ लागले. इकडे शम्मी कपूरने (Shammi Kapoor) गीता बाली सोबत १९५६ साली लग्न केले तर तिकडे इजिप्तमध्ये त्या मुलीने आपला संसार थाटला. आयुष्यात पुढे हे दोघे कधीही एकत्र भेटले नाही! परंतु पहिलं प्रेम म्हणून शम्मी कपूर कायम त्या मुलीची आठवण काढत राहिले. ‘लहरे’ या व्हिडिओ चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत शम्मी कपूरने आपल्या पहिल्या प्रेमाचा हा किस्सा सांगितला होता.