Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ची जादू झाली कमी, पहा किती केली कमाई
प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष‘ सिनेमा ट्रेलर पासूनच खुप चर्चेत राहिला आणि रिलीज झाल्यानंतरही हा सिनेमा चांगल्या वाईट गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. त्यामुळे आदिपुरुष ची जादू बॉक्स ऑफिस वर किती चालणार याचकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे तर आता सिनेमाची पाचव्या दिवसाची कमाई समोर आली आहे. चित्रपटाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, ते पाहता येत्या काही दिवसांत आणि आठवडय़ात हा चित्रपट अनेक विक्रम मोडेल, असे वाटत होते, मात्र तसे होताना काही दिसत नाहीये. खरं तर या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये असलेल्या नैराश्यामुळे त्याचा थेट परिणाम त्याच्या कमाईवर दिसून येत आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने भरघोस कमाई केली. पण चौथ्या आणि पाचव्या दिवसाची कमाई पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकणार नाही असं दिसतंय. तर या चित्रपटाने यापूर्वीच 250 कोटींपेक्षा जास्त ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. आदिपुरुषने पाचव्या दिवशी किती कमाई केली ते आता सविस्तर जाणून घेऊयात.(Adipurush Box Office Collection)
बॉक्स ऑफिस ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार आदिपुरुषने पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 10.80 कोटींची कमाई केली आहे. यानंतर भारतात चित्रपटाची एकूण कमाई 247.90 कोटींवर गेली आहे. चार दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 86.75 कोटी, दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.1 कोटी, चौथ्या दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे. मात्र, दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा किती कमाई करतो हे पाहावं लागेल. आदिपुरुष या चित्रपटाला त्याच्या खराब डायलॉग्स आणि खराब व्हीएफएक्समुळे खूप ट्रोल केले जात आहे. निगेटिव्ह रिव्ह्यू असूनही ‘आदिपुरुष’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली असली तरी पाचव्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये विरोधाचा परिणाम दिसून येत आहे. या वादावर अद्याप कोणत्याही स्टारकास्टने मात्र प्रतिक्रिया दिलेली नाही.
आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. प्रभासशिवाय क्रिती सेनन आणि सैफ अली खान, सनी सिंह, वत्सल सेठ, देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत. रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले तर लोकांना आणि समीक्षकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही, ज्यामुळे निर्माते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करताना दिसत आहेत.(Adipurush Box Office Collection)
=============================
=============================
तसेच अलीकडेच ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (एआयसीडब्ल्यूए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची मागणी सुद्धा केली आहे.आता येणाऱ्या आठवड्यात हा सिनेमा कमाईत पुन्हा वर येतो की आहे त्यापेक्षा ही घसरतो हे लवकरच समजेल.