‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अभिनेत्रीच्या ‘इगोस्टिक एटीट्यूड’ ने घडलं असं काही…
बॉलीवूडच्या अशा काही भन्नाट स्टोरी अशा आहेत की, ज्याची रंजकता आज देखील कायम आहे. हा किस्सा १९७७ सालचा आहे. निर्माते कृष्णा शहा ज्यांनी हॉलीवुडमध्ये अनेक चित्रपट प्रोड्यूस केले होते, त्यांनी भारतामध्ये एक सिनेमा प्रोड्यूस आणि डायरेक्ट करायचा ठरवले. चित्रपटाचे नाव होतं ‘शालिमार’. अतिशय भव्य दिव्य असा हा सिनेमा होता आणि त्याकाळात या सिनेमाची भरपूर चर्चा मीडिया मधून होत होती. याचे दुसरे कारण असेही होते की, हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट होता. इंडो अमेरिकन असे जॉईंट कोलॅब्रेशन होतं. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बनणार होता आणि या सिनेमांमध्ये बॉलिवूड आणि हॉलीवुड मधील नामांकित कलाकार काम करणार आहोत. बॉलीवूडमधील धर्मेंद्र, झीनत अमान, शम्मी कपूर आणि ओ पी रल्हन होते. तर हॉलीवुड कडून रेक्स हॅरीसन, सिल्विया माईल्स, जॉन सॅक्सोन हे कलावंत चित्रपटात दिसणार होते. चित्रपटाची प्रचंड हवा निर्माण झाली होती. याचा मुहूर्त देखील मोठा स्टायलिश होणार होता. या मुहूर्तासाठी हॉलीवुडची त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री जिना लोलोब्रिगीडा येणार होती. (या देखण्या अभिनेत्रीचे या वर्षी १६ जून २०२३ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.) पन्नास आणि साठ दशकामध्ये जिना हॉलीवुड मधली प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्याने सारे जग घायाळ झाले होते. ‘कम सप्टेंबर’ (१९६१) या लोकप्रिय चित्रपटाची ती नायिका होती. (Zeenat Aman)
‘शालीमार’ या सिनेमाचा मुहूर्त ७ एप्रिल १९७७ या दिवशी मुंबईच्या टर्फ क्लबवर होणार होता. अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा होता. या मुहूर्ताला कॅमेरा ऑन करण्यासाठी दिलीप कुमार आणि सायराबानू यांना पाचारण करण्यात आले होते. हा सोहळा प्लॅनिंग होत असतानाच चित्रपटाची अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) तिच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता. तिने या मुहूर्तासाठी सर्वात उशिरा टर्फे क्लबवर एन्ट्री घ्यायचे ठरवले. जेणेकरून तिचे इम्पॉर्टन्स वाढले जाईल. या चित्रपटाची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर राणी सिंग होती. तिनेच जिना लोलोब्रिगीडा ला या मुहूर्तासाठी बोलावले होते. राणी सिंगला वाटले हॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जिना हिने या मुहूर्तासाठी सर्वात लेट एंट्री घ्यावी जेणेकरून मीडियाचा सर्व फोकस तिच्यावर राहील. बरोबर सात वाजता टर्फ क्लब वर धर्मेंद्र हजर झाला. दिलीप कुमार, सायरा बानू हे देखील वेळेत पोहोचले. सिनेमातील इतर कलावंत तसेच बॉलीवूडमधील अनेक सितारे, मुंबईतील मातब्बर व्यक्ती वेळेवर.
आता इंतजार होता तो सिनेमाची हिरोईन झीनत अमान (Zeenat Aman) आणि खास हॉलीवुड होऊन आलेली अभिनेत्री जिना लोलोब्रिगीडा हिचा! पण काही केल्या दोघींपैकी कोणीही येत नव्हतं, आठ वाजले, नऊ वाजले. कंटाळून दिलीप कुमार आणि सायरा बानो त्या पार्टीतून निघून गेले. दिलीप कुमारच्या जाण्याने दिग्दर्शक कृष्णा शहा खूप नाराज झाले. त्यांनी सिनेमाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर रानी सिंग यांना फोन करून सांगितले ताबडतोब जिना लोलोब्रिगीडाला घेऊन तू हजर हो. अशा पद्धतीने रात्री दहा वाजता रानी सिंग जिना लोलोब्रिगीडाला घेऊन पार्टीच्या ठिकाणी आली. सर्व मीडिया तिचे फोटो काढण्यात आणि स्वागत करण्यात व्यस्त झाला. चकाचक फ्लॅश पडू लागले. जो तो जिनाला पाहण्यासाठी उत्सुक होता. मात्र त्यानंतर केवळ दहाच मिनिटात झीनत अमानचे टर्फ क्लबवर आगमन झाले. तिचा त्यावेळचा अटायर भन्नाट होता. सर्व मीडिया आता झीनतकडे वळला. झीनतवर फ्लॅशचा भडीमार होऊ लागला. प्रत्येकजण तिचे अभिनंदन करत होता. कारण एका इंटरनॅशनल प्रोजेक्ट असलेल्या सिनेमाची ती हीरोइन होती. झीनतला हेच हवे होते. प्रसिद्धीचा झोत तिला आपल्यावरच जास्त हवा होता!
======
हे देखील वाचा : आप जैसा कोई मेरे जिंदगी में आयें…
======
कार्यक्रम सुरू झाला जिना लोलोब्रिगीडाने क्लॅप दिला. कृष्णा शहा यांनी ‘लाईट कॅमेरा ॲक्शन’ म्हटले. पहिला शॉट घेतला. झीनत अमान धावत धावत धर्मेंद्रकडे येते त्याच्या बाहूपाशात शिरते आणि धर्मेंद्र तिचे प्रदीर्घ चुंबन घेतो. (अर्थात हा शॉट इंग्लिश व्हर्शनसाठी होता हिंदीमध्ये नव्हता!) साऱ्या जगभरातल्या मिडिया कर्मीनी तो शॉट आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. (Zeenat Aman)
अशा पद्धतीने दोन अभिनेत्रींच्या इगो पायी शालिमार चित्रपटाचा मुहूर्त तब्बल चार तास उशिरा झाला. यानंतर सुप्रसिद्ध सिने पत्रकार बनी रुबेन यांनी झीनतला नंतर विचारले होते,” तुझा कोणी जासूस टर्फ क्लब आधीच उपस्थित होता का? कारण जिना लोलोब्रिगीडा आल्यानंतर केवळ दहाव्या मिनिटाला तुझी एन्ट्री झाली!” त्यावर झीनत अमान (Zeenat Aman) हिने एक डोळा मारून मिस्कील स्मित हास्य. जगभरातल्या मिडिया समोर झीनतला स्वत:ला प्रोजेक्ट करायचे होते ते सध्या झाले. शालीमार हा चित्रपट ८ डिसेंबर १९७८ रोजी प्रदर्शित झाला अतिशय बिग बजेट असलेला हा सिनेमा बिगेस्ट फ्लॉप ठरला. या सुपरफ्लॉपची वेगळी कारणे होती त्याबद्दल पुन्हा कधीतरी आपण चर्चा करू पण शालीमारचा हा मुहूर्त पुढे मीडियामध्ये बराच काळ चर्चिला जात होता!