Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!

Filmistan Studio : फिल्मीस्तान स्टुडिओत डोकावताना…..

Rinku Rajguru : “आपलं मुळ कधी विसरु नये”; २० वर्षांनी

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘कुन्या राजाची गं तू रानी’ लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला !

 ‘कुन्या राजाची गं तू रानी’ लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला !
kalakruti-kunya-rajachi-tu-rani-marathi-serial-is-all-set-to-hit-the-screens-soon-marathi-info/
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘कुन्या राजाची गं तू रानी’ लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला !

by शुभांगी साळवे 04/07/2023

ह ल्ली टेलिव्हिजन वर वेगवगेळ्या विषयाच्या आणि धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.स्टार प्रवाह वाहिनी दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ही लोकप्रिय वाहिनी प्रेक्षकांसाठी नव्या मालिकेच्या रुपात मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. १८ जुलैपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘कुन्या राजाची गं तू रानी’. डोंगरपाड्यासारख्या छोट्याश्या गावात वाढलेल्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट या मालिकेतून पहायला मिळेल. गुंजा डोंगरपाड्याच्या निसर्गासारखी अगदी निरागस. स्वत: आनंदात राहून इतरांनाही भरभरुन आनंद देणाऱ्या गुंजाला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आईला शहरात घेऊन जायचं आहे. (Kunya Rajachi g tu Rani Serial)

Kunya Rajachi g tu Rani Serial
Kunya Rajachi g tu Rani Serial

एकीकडे गुंजाची निरागस स्वप्न तर दुसरीकडे करिअरवर भरभरुन प्रेम करणारा कबीर. पेश्याने पत्रकार. एका मध्यमवर्गी घरात जन्मलेला, खडतर प्रवास करून मोठा झालेला आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून खूप कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवलेला धडाडीचा पत्रकार. त्याला समाजात बदल घडवायचा आहे. शोषितांचा लढा लढायचा आहे, आणि त्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा खडतर मार्ग स्वीकारायला तयार आहे. अश्याच एका बातमीच्या मागावर असताना कबीर आणि गुंजाची भेट होते. मात्र गावाच्या एका कठोर निर्णयामुळे दोघांच्याही आयुष्याला नवी कलाटणी मिळते. तिथूनच सुरुवात होते नव्या नाट्याची. अतिशय उत्कंठावर्धक अशी मालिकेची गोष्ट असणार आहे.

Kunya Rajachi g tu Rani Serial
Kunya Rajachi g tu Rani Serial

स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेची वातावरण निर्मिती, तिचा बाज आणि कथा ही इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. गुंजा या अतिशय धडाडीच्या मुलीची ही गोष्ट आहे तिला कालांतराने एका प्रामाणिक मुलाची साथ मिळते. तोपर्यंत हा प्रवास बघणं खूप उत्सुकता निर्माण करेल. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच दर्जेदार मालिका सादर करते, ही मालिका तशीच आहे. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये असं सांगणारी नायिका या मालिकेतही पहायला मिळेल.’((Kunya Rajachi g tu Rani Serial )

==========================

हे देखील वाचा: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

==========================

दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अतकरी या मालिकेत कबीर ही व्यक्तिरेखा साकारत असून नवोदित अभिनेत्री शर्वरी जोग गुंजाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच वृंदा अहिरे, समिधा गुरु, वसुधा देशपांडे, संजय खापरे, पूर्णिमा डे, राजन भिसे, वनश्री पांडे अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘कुन्या राजाची गं तू रानी’ १८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress sharvari jog Entertainment harshadatkari Kunya Rajachi g tu Rani Kunya Rajachi g tu Rani Serial marathi setial star Pravah serial
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.