‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुपरहिट सिनेमामुळे अमिताभ यांना चित्रपटातून काढले…
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कधीकधी गंमतीशीर गोष्टी घडतात. एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट सुपरहिट झाला तर साहजिकच त्याच्याकडे अनेक निर्मात्यांचे लक्ष वळते आणि त्याच्यासमोर चित्रपटांची मोठी रांग लागते. पण एक उदाहरण असे देखील आहे की, एक चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्या अभिनेत्याला त्याचा पुढचा चित्रपट गमवावा लागला! त्याला चक्क त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले! काय होता तो किस्सा? कोण होता हा अभिनेता? हा किस्सा आहे १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुड्डी‘ या चित्रपटाचा. (Amitabh Bachchan)
‘गुड्डी’ हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता आणि अभिनेत्री जया भादुरीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचा नायक आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होता. तसं झालं असतं तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया भादुरीचा हा पहिला चित्रपट झाला असता. या सिनेमाच्या चित्रीकरणाचे पहिले दहा दिवसांचे शेड्युल अमिताभ आणि जया या दोघांनी मुंबईत केले. त्यानंतर अमिताभ ‘प्यार की कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मद्रासला निघून गेला.
तिथे एक दिवस त्याला ऋषिकेश मुखर्जी यांचा फोन आला आणि त्यांनी अमिताभला (Amitabh Bachchan) सांगितले,” आता तू या चित्रपटाचा नायक नाहीस. या सिनेमातून आम्ही तुला काढून टाकत आहोत.” अमिताभ च्या पायाखालची जमीन च सरकली. तो पार भंजाळून गेला. हा काय प्रकार? तो लगेच मुंबईला रवाना झाला. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ऑफिस मध्ये जावून तो म्हणाला, “दादा मेरा क्या प्रॉब्लेम है? किस गलती की सजा आप दे रहे हो?” त्यावर ऋषिकेश मुखर्जी हसले आणि म्हणाले,” यात तुझा काहीच प्रॉब्लेम नाही. तुझा ‘आनंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सुपरहिट झाला आहे. आता संपूर्ण भारत देशात लोक तुला ओळखू लागले आहेत. मला ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी असा नायक हवा होता त्याला कुणी ओळखत नाही. आता तर तू लोकप्रिय नायक झाल्यामुळे मला या चित्रपटातील तुला काढावे लागत आहे. आता या चित्रपटात तुझी भूमिका बंगाली अभिनेता समित भांजा करणार आहे!” हे ऐकल्यावर अमिताभ बच्चनने (Amitabh Bachchan) सुटकेचा निश्वास टाकला. आधीचा चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्याला ‘गुड्डी’ या चित्रपटातील भूमिका गमवावी लागली.
जर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘गुड्डी’ या सिनेमात राहिला असता जया भादुरी-अमिताभ बच्चन यांचा तो पहिला चित्रपट झाला असता. पण तसं होणार नव्हतं. ऋषिकेश मुखर्जी यांनी अमिताभ बच्चनला तिथेच शब्द दिला,” काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्या सोबत एक नवीन चित्रपट करणार आहे.” ऋषिदा यांनी त्यांचा शब्द पाळला आणि लगेच ‘नमक हराम’ हा चित्रपट त्याच्या सोबत साईन केला. तसेच अमिताभ बच्चन आणि जया भादुरीला घेऊन ‘अभिमान’ हा चित्रपट देखील बनवला. आता थोडंसं ‘गुड्डी’ या सिनेमाबद्दल.
=======
हे देखील वाचा : दुप्पट मानधन घेऊन किशोरकुमारने केला सिनेमा सुपरहिट
=======
या चित्रपटातील जयाची निवड कशी झाली? जया भादुरी तेव्हा पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट इथे शिकत होती. एकदा ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार पुण्याला गेले असताना तिथे प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना जया भादुरी दिसली आणि त्यांनी लगेच या भूमिकासाठी तिला साईन केले. (खरं तर या भूमिकेसाठी त्यांच्या मनात आधी डिंम्पल कपाडिया होती.) जयाने या पूर्वी सत्यजित रे यांच्या ‘महानगर’ चित्रपटात भूमिका केली होती. काय गंमत असते पाहा. ऋषिदा जर पुण्यात गेलेच नसते आणि ’गुड्डी’ ची भूमिका जर डिंपलनेच केली तर ’बॉबी’चे काय झाले असते? आणि जयाला जर ’गुड्डी’ मिळाला नसता तर ती बंगाली सिनेमात परत गेली असती कां? आणि सगळ्यात महत्वाचं सत्तरच्या दशकातील दोन सुपरस्टारची लग्ने कुणाशी झाली असती? या जर तर चीच मोठी गंमत असते ना?