मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
Adipurush OTT Release: प्रभासचा ‘आदिपुरुष’ ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल
अभिनेता प्रभासचे ‘सालार‘ आणि ‘प्रोजेक्ट के’ हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. प्रभास, क्रीती सेनोन , सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांचा ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट १६ जून रोजी मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला होता. पण अपेक्षेच्या उलट या चित्रपटाला वादाला सामोरे जावे लागले. प्रभासच्या करिअरवर या चित्रपटाचा सकारात्मक परिणाम झाला नसला तरी चित्रपटानेबरीच कमाई केली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्यक्तिरेखा आणि संवादांमुळे बराच मोठा वाद निर्माण झाला आणि चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली असून ही काही दिवसांनी चित्रपटाची जादू हळूहळू कमी होऊ लागली. अखेर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे वर्ल्डवाइड क्लोजिंग कलेक्शन समोर आले आहे. तसेच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.’आदिपुरुष’ सिनेमाबद्दल बद्दल बराच वाद झाला होता. त्यानंतर चित्रपटाचे संवाद बदलण्यात आले होते. आणि नंतर या चित्रपटाचे कलेक्शन घसरले. याचा संपूर्ण दोष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर शुक्ला आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर पडला. या वादानंतर दोघांनाही पोलिस संरक्षण ही देण्यात आले आहे.(Adipurush OTT Release)
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘आदिपुरुष’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट 2023 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. ‘आदिपुरुष’ लवकरच आपल्या टेलिव्हिजन किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हाय डेफिनिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत, क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत, सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत, सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत पहायला मिळाले होते.(Adipurush OTT Release)
=========================
हे देखील वाचा: अभिनेता सुनील शेट्टीला टोमॅटोवर केलेल वक्तव्य पडले भारी; मागवी लागली शेतकऱ्यांची माफी
=========================
आदिपुरुषचे लेखन आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. आणि हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती, पण चित्रपटगृहात पोहोचल्यानंतर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही त्याला निराशाजनक प्रतिसाद मिळाला.या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे देशभरात अनेक आंदोलने झाली आणि त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. पुढे मजुबरन प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना चित्रपटातील काही संवाद बदलावे लागले.