Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

OMG 2 Trailer Release: भक्तासाठी पृथ्वीवर येणार भोलेनाथ; अखेर ओमजी 2 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर !

 OMG 2 Trailer Release: भक्तासाठी पृथ्वीवर येणार भोलेनाथ; अखेर ओमजी 2 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर !
kalakruti-omg-2-trailer-release-bholenath-to-come-to-earth-for-devotee-the-trailer-of-omg-2-is-finally-out-marathi-info/
मिक्स मसाला

OMG 2 Trailer Release: भक्तासाठी पृथ्वीवर येणार भोलेनाथ; अखेर ओमजी 2 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर !

by शुभांगी साळवे 03/08/2023

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘ओह माय गॉड 2‘ चित्रपटाचा ट्रेलर अखेर चाहत्यांसमोर आला आहे. अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहे. दरम्यान,ओह माय गॉड 2 या चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्याचा ट्रेलर 2 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. पण भारतीय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आकस्मिक निधनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर आज या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्या ट्रेलर ला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे आणि सोशल मीडियावर ट्रेलरची चर्चा जोरदार सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’ सोबत म्हणजेच ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.(OMG 2 Trailer Release)

ओएमजी 2 चा ट्रेलर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, स्वागताची तयारी सुरू करा, डमरुधारी ११ ऑगस्टला येत आहे. ‘ओह माय गॉड’मध्ये कान्हाच्या भूमिकेत परेश रावलला कोर्टात मदत करणारा अक्षय कुमार आता शिवाचा अॅम्बेसेडर बनून पंकज त्रिपाठीच्या अडचणींवर मात करताना दिसणार आहे.ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी जे शिवभक्त आहे आणि अक्षय कुमार त्यांच्या रक्षणासाठी शिवाच्या रूपात येताना दिसतो. या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात भगवान शिवच्या एका संवादाने होते, जो नंदीला आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी देवदूत पाठविण्यास सांगतो. ज्यानंतर शिवभक्त असलेल्या पंकज त्रिपाठीची एन्ट्री होते. भगवान शिव आपल्या कुटुंबावरील आपत्ती कशी दूर करतात हे या चित्रपटात पाहायला प्रेक्षकांना  मिळणार आहे. ट्रेलरमध्ये यामी गौतमची वकील स्टाईल देखील दिसत आहे, तर अरुण गोयल प्राचार्याच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे.

OMG २ हा २०१२ मध्ये आलेल्या OMG या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात अक्षय कुमारव्यतिरिक्त परेश रावल देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९३ कोटींची कमाई केली होती.(OMG 2 Trailer Release)

========================

हे देखील वाचा: Ved Movie Television Premier: महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी लवकरच टेलिव्हिजनवर… 

=======================

अमित राय दिग्दर्शित आणि वायकॉम १८ च्या बॅनरखाली तयार झालेला ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आणि अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘गदर २’ शी विरुद्ध असणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar Bollywood movie 2023 Entertainment OMG 2 Trailer OMG 2 Trailer Release OMG Hindi movie pankaj tripathi yami gautami
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.