दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जिच्या जन्मदिनी रेखा उपस्थित होती तीच पुढे तिची सौतन बनली!
कधीकधी आयुष्यात खूप गमतीशीर घटना घडतात. आता हेच पहा ना, अभिनेत्री रेखा हिच्या समोर ज्या अभिनेत्रीने जन्म घेतला होता. ज्या अभिनेत्रीच्या जन्माच्या पहिल्याच दिवशी रेखाने पाहिलं होतं कडेवर घेतलं होतं, जिला खेळवलं होतं; त्याच अभिनेत्री सोबत रेखाने एका चित्रपटात चक्क त्या अभिनेत्रीची ‘सौतन’ म्हणून रुपेरी पडद्यावर काम केले होते! चक्रावून गेलात ना ? पण खरंच तशीच गोष्ट आहे. अभिनेत्री रेखा १९७० साली रुपेरी पडद्यावर आली. तिचा पहिला चित्रपट होता ‘सावन भादो’ नायक होता नवीन निश्चल. दिग्दर्शक मोहन सैगल. (Rekha)
याच वर्षी अभिनेता रणधीर कपूर यांनी देखील रुपेरी पडद्यावर पदार्पण केले ते अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून. चित्रपट होता आर के फिल्मचा ‘कल आज और कल’. हा चित्रपट रणधीर कपूरने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा तो नायक होता यात त्याची नायिका होती बबीता. या चित्रपटात कपुर खानदानीच्या तीन पिढ्यांनी एकत्र काम केले होते. पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर. म्हणूनच चित्रपटाला नाव दिले होते ‘कल आज और कल’ हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही पण रणधीर कपूर साठी हा सिनेमा लकी ठरला. कारण याच सिनेमाची नायिका बबिता हिच्या तो प्रेमात पडला आणि ६ नोव्हेंबर १९७१ रोजी त्यांचे लग्न झाले ! त्याला इतर बॅनरचे चित्रपट देखील मिळू लागले १९७३ साली त्याने अभिनेत्री रेखा सोबत पहिला चित्रपट केला ‘रामपूर का लक्ष्मण.’(Rekha)
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मनमोहन देसाई. या सिनेमात शत्रुघ्न सिन्हाची खलनायकाची भूमिका होती. आर डी बर्मन यांचे लज्जतदार संगीत त्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला. रणधीर कपूर आणि रेखा या जोडीच्या चित्रपटांची रांगच लागली. ही लोकप्रियता लक्षात घेऊनच राज कपूरने आपल्या आर के फिल्मच्या ‘धरम करम’ या चित्रपटासाठी देखील या दोघांना साईन केले. या ‘धरम करम’ चे चित्रीकरण आर के स्टुडिओमध्ये चालू होते. २५ जून १९७४ या दिवशी चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना रणधीर कपूर यांना फोन आला की, त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली आहे आणि लवकरच ती एका बाळाला जन्म देणार आहे. रणधीर कपूरची पत्नी बबीता त्यावेळी प्रेग्नेंट होती. कधीही न्यूज येणार होती. म्हणून तो तयारच होता. तो ताबडतोब पॅकअप करून हॉस्पिटलकडे जायला निघाला ; तेव्हा अभिनेत्री रेखा म्हणाली,” मी देखील तुझ्यासोबत येते!” रणधीर कपूर आणि रेखा हे दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. थोड्याच वेळात बबीता ने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तो दिवस होता २५ जून १९७४. रेखाने त्या सुंदर मुलीला घेऊन तिचे कोड कौतुक केले. रणधीर कपूर आणि बबीता या दोघांचे अभिनंदन केले. या मुलीचे नाव करिष्मा कपूर.
पुढे यथावकाश करिष्मा कपूर देखील १९९१ साली सिनेमांमध्ये आली. अभिनेत्री रेखा (Rekha) चित्रपटात काम करतच होती. २००२ साली श्याम बेनेगल यांचा एक चित्रपट आला होता ‘झुबेदा.’ या चित्रपटात करिष्मा कपूरने रेखाच्या ‘सौतन’ चा रोल केला होता!! हा चित्रपट एक बायोपिक होता. महाराणी मंदिरा देवी यांच्या जीवनावरच्या या चित्रपटात मनोज वाजपेयी (महाराजा विजयेंद्र सिंग) यांच्या पत्नीचा रोल रेखाने केला होता. तर मनोज वाजपेयी यांच्या प्रेयसीची ‘झुबेदा’ ची भूमिका करिष्मा कपूर ने केली होती. याचा अर्थ रेखा आणि करिष्मा कपूर एकमेकीच्या ‘सौतन’ या चित्रपटात झाल्या होता! ज्या मुलीचा जन्म आपल्या डोळ्यासमोर झाला तीच मुलगी २७ वर्षानंतर तिची ‘सवत’ म्हणून चित्रपटात समोर आली! रेखाने एका मुलाखतीत हा गमतीशीर केसचा शेअर केला होता. (Rekha)
==========
हे देखील वाचा : ‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !
==========
जात होता थोडसं या जुबेदा चित्रपटाबद्दल. या सिनेमाची पटकथा खालीद मोहम्मद यांनी लिहिली आहे. खालील मोहम्मद हे संपादक, पत्रकार,पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सुपरिचित आहे. महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे खालीद मोहम्मद हे ‘जुबेदा बेगम’ यांचे पुत्र आहेत. म्हणजे आपल्या सख्ख्या आईच्या आयुष्याची शोकांतिका त्यांनी या चित्रपटातून मांडली होती !