दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अशाप्रकारे आशा पारेख ठरली हिट गर्ल…
हिंदी सिनेमा गोल्डन इरा मधील कलावंत आता आपली आत्मचरित्र लिहू लागली आहे त्यातून खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी वाचकांना वाचायला मिळत आहे. चित्रपटाच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट असा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आशा पारेख साथ आणि सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या ‘आशा पारेख: द हिट गर्ल’ या पुस्तकात अशाच काही मनोरंजक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
हुकमी यशाची नायिका असा त्यांचा लौकिक होता. पण त्यांच्यात हिरोईनचे मटेरियल नाही म्हणून पहिल्याच साईन केलेल्या सिनेमातून हकालपट्टी झाली होती हे तुम्हाला माहित आहे का? आशा पारेख यांचा पहिला चित्रपट ‘दिल देके देखो’ हा १९५९ साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांची निवड कशी झाली होती हा किस्सा खूप वाचण्यासारखा आहे.
आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४१ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम सुरू केले. ‘चैतन्य महाप्रभू’ या १९५४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. हा चित्रपट विजय भट यांनी दिग्दर्शित केला होता . या चित्रपटाची नायिका होती अमिता. १९५८ साली जेव्हा आशा पारेख सोळा वर्षाची झाली त्यावेळेला विजय भट यांनी तिला आपल्या ‘गूंज उठी शहनाई ‘ या चित्रपटाची नायिका म्हणून साइन केले.
आशा अर्थातच खूप खुश झाली कारण पहिला चित्रपट तो देखील एका मातब्बर दिग्दर्शकाचा. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे शूटिंग देखील पार पडले. पण त्यानंतर विजय भट यांना आशा पारेख हिच्यात कुठलेही हीरोइन मटेरियल नाही असे वाटू लागले आणि त्यांनी चक्क तिला सिनेमातून काढून टाकले. आशा ला खूप वाईट वाटले पण काय करणार? तिच्या जागी वर्णी लागली अमिता या अभिनेत्रीची.
कारण अमिताचा ‘तुमसा नही देखा’ हा चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. विजय भट यांनी अमिताला आपल्या ‘गूंज उठी शहनाई’ ची नायिका बनवले. नासीर हुसैन ‘तुमसा नही देखा’ चे दिग्दर्शक होते. त्यांचा पुढचा चित्रपट होता ‘दिल देके देखो’ त्याचा नायक देखील शम्मी कपूरच होता. नासीर हुसैन ‘तुमसा नही देखा’ ची हिट पेयर या सिनेमात पुन्हा रिपीट करणार अशी खात्री सर्वाना होता तशीच ती अभिनेत्री अमिताला देखील होती. पण झाले उलटेच! दिग्दर्शक नासिर हुसैन यांना ‘दिल देके देखो’च्या नायिकेच्या भूमिकेसाठी अमिता फिट वाटली नाही. म्हणून त्यांनी नवीन हीरोइन ट्राय करायचा प्रयत्न केला. त्यातून निवड झाली आशा पारेख ची !
============
हे देखील वाचा : यामुळे मेहबूब यांच्या ‘अमर’ चित्रपटातून मीनाकुमारी बाहेर पडली.
=============
म्हणजे गंमत पहा, ‘गूंज उठी शहनाई’ची आधी नायिका होती आशा पारेख तिला काढून तिच्या जागी अमिता आली ! तर ‘दिल देके देखो’ या चित्रपटाची नायिका अमिता असणार होती पण तिच्या जागी आली आशा पारेख ! अशा प्रकारे त्यांची फिट्टम फाट झाली. आणि आशा पारेख ला पहिला चित्रपट मिळाला ‘दिल देके देखो’. या सिनेमा पासून नासीर हुसैन आणि आशा पारेख यांची घट्ट युती झाली आणि तब्बल पुढची बारा वर्ष (१९७१ सालच्या कारवां पर्यंत) त्यांच्या सर्व चित्रपटांची नायिका आशा पारेखच राहीली! अर्थात अमिता आपल्या अभिनयाच्या जोरावर फार पुढे जाऊ शकली नाही पण आशा पारेख मात्र हिट गर्ल ठरली आणि साठ आणि सत्तरच्या दशकाची ती आघाडीची अभिनेत्री ठरली!