दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जितेंद्र हेमामालिनी ची ऑफ बीट लव्ह स्टोरी !
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडीच्या प्रेम कहाणीच्या स्टोरी आज देखील मोठ्या चवीने वाचल्या जातात. या दोघांची पहिली भेट के ए अब्बास यांच्या एका चित्रपटाचा प्रीमियर च्या वेळी झाली होती. त्यावेळी हेमामालिनीचे देखणेपण पाहून धर्मेंद्र पुरता पागल झाला होता. ‘क्या चंगी कुडी है यार …’ असं तिला पाहून तो म्हणाला होता. हेमा देखील आपली तारीफ ऐकून नखशिखांत लाजली होती. तोवर हेमाचा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता ‘सपनो का सौदागर’ आणि तो देखील फ्लॉप झाला होता. (Jitendra Hemamalini)
याच काळात तिला संजीव कुमार सोबत ‘धूप छांव’ या चित्रपटासाठी साइन करण्यात आले. संजीव कुमार सुरुवातीपासूनच एक मॅच्युअर्ड व्यक्ती होता. त्याला देखील हेमा पाहता क्षणी आवडली होती. त्याने मोठ्या अदबीने आपले प्रेम तिच्यापुढे व्यक्त केले पण हेमामालिनीच्या आईने जया चक्रवर्तीने आम्ही हेमाचे लग्न आमच्या जात बिरादरीतच करणार आहोत असे सांगून त्याचा पत्ता कापला! असे म्हणतात हेमामालिनीच्या नकारामुळेच संजीव कुमार याला मद्यपानाची सवय लागली.
याच काळात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना भप्पी सोनी यांच्या ‘तुम हंसी मै जवां’ (१९६९) या चित्रपटासाठी साईन केले या दोघाची हि पहिलीच मूव्ही होती. या सिनेमात हे दोघे खूपच जवळ आले. जया चक्रवर्ती यांना वाटले ‘धर्मेंद्र हा विवाहित पुरुष आहे त्याला मोठ्या वयाची मुले आहेत तो कशाला आपल्या मुलीच्या प्रेमात पडेल? म्हणून त्यांनी देखील तिकडे लक्ष दिले नाही. पण झाले उलटेच. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या प्रेम कहाणीचा इथूनच प्रारंभ झाला.(Jitendra Hemamalini)
याच काळात हेमामालिनी जितेंद्र सोबत ‘वारीस’ या चित्रपटात काम करत होती. हेमाला पाहून जितेंद्र पहिल्याच सिनेमात लट्टू झाला होता. त्याला देखील तिच्यासोबत लग्न करायचे होते. ते दोघे पुढे अनेक चित्रपटात एकत्र काम करत होते.(गहरी चाल, भाई हो तो ऐसा) ‘दुल्हन’ या चित्रपटाच्या सेटवर जितेंद्रने हेमा ला चक्क प्रपोज केले. हेमा च्या घरच्यांनाही हे स्थळ फारसे वावगे वाटले नाही. एक तर जितेंद्र त्यांना त्यांच्या तोला मोलाचे स्थळ वाटत होते आणि मुख्य म्हणजे तो अविवाहित होता. जितेंद्रने ताबडतोब आपल्या आई-वडिलांना मद्रासला बोलवून घेतले आणि तिरुपतीला जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेमा देखील या निर्णयाला तयार झाली.
जेव्हा ही खबर मुंबईला धर्मेंद्र पर्यंत पोहोचले तेव्हा तो आग बबूला झाला. तो तडक जाऊन जितेंद्र ची गर्लफ्रेंड शोभा सिप्पी ला भेटला. शोभा सिप्पी आणि जितेंद्र हे लहान पणा पासून चे मित्र होते. दोघांचे परस्परांवर प्रेम देखील होते. धर्मेंद्र आणि शोभा सिप्पी ताबडतोब पुढच्या फ्लाईटने मद्रास मध्ये दाखल झाले. त्या दोघांनी तिथे असा काही इमोशनल ड्रामा केला की जितेंद्र आणि हेमा चे लग्न कॅन्सल झाले. सर्व जण मुंबई ला परतले. नंतर ३१ ऑक्टोबर १९७४ या दिवशी जितेंद्र आणि शोभा सिप्पी यांचे शुभ मंगल झाले. जितेंद्र आणि हेमा हे दोघेही प्रोफेशनल कलावंत . दोघांनी झालेला प्रकार विसरून पुढे अनेक चित्रपटात एकत्र भूमिका केल्या.(Jitendra Hemamalini)
=============
हे देखील वाचा : गायक मुकेशचा दिलदारपणा…
=============
(ज्योती, खुशबू, किनारा, हम तेरे आशिक है,मेरी आवाज सुनो,फर्ज और कानून,जस्टीस चौधरी,कैदी). जितेंद्र हेमामालिनीच्या या ऑफ बीट लव्ह स्टोरी मुळे धर्मेंद्र मात्र खूप सावध झाला. असे म्हणतात ‘शोले’ चित्रपटातील धर्मेंद्र ची भूमिका आधी संजीव कुमार व ऑफर झाली होती पण या सिच्युएशनमध्ये संजीव कुमारची नायिका हेमा मालिनी झाली असती त्यामुळे ती भूमिका धर्मेंद्र ने जुगाड करून पटकावली. संजीव कुमार ने लग्न न केल्याने धर्मेंद्र त्याच्या बाबतीत खूपच दक्ष असायचा.’ सीता और गीता’ आणि ‘धूप छांव’ हे सिनेमे वगळता इतर कुठल्याही सिनेमात हेमामालिनी आणि संजीव कुमार नायक नायिकेच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर एकत्र आले नाहीत! धर्मेंद्र आणि हेमा च्या लग्नाला मात्र १९८० साल उजाडावे लागले. हा सर्व किस्सा हेमामालिनीच्या आत्मचरित्रात लिहिला आहे.
जाता जाता १९६९ साली सेटवर गेलेला संजीव कुमार आणि हेमामालिनीचा ‘धूप छांव’ हा चित्रपट तब्बल आठ वर्षांनी १९७७ साली रडत खडत कसाबसा पूर्ण झाला . प्रदर्शित झाला आणि फ्लॉप झाला !