दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Pushpa 2: रिलीजआधी ‘पुष्पा २’ने रचला ‘हा’ रेकॉर्ड; कमावणार ‘इतके’ कोटी
“मै झुकेगा नही साला” म्हणत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा‘ (Pushpa 2) या चित्रपटाने २०२१ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. कोविड काळात ओटीटीसारखं मोठं आव्हान समोर असतानाही या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं. ‘
पुष्पा द राइज (Pushpa 2) हा २०२१ सालचा पहिला असा चित्रपट होता जो ओटीटीवर प्रदर्शित होऊनसुद्धा बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल होत होता.
या चित्रपटाने एकूणच बॉक्स ऑफिसची गणितंच बदलून टाकली. हिंदी डबसाठी वापरलेला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज, सुकुमार यांचं लाजवाब दिग्दर्शन, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची दमदार केमिस्ट्री, समांथाचं आयटम नंबर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट गाजला. २०२१ पासूनच याच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
मध्यंतरी यांच्या सीक्वलचं चित्रीकरण रखडल्याने हा चित्रपट थोडा लांबणीवर पडला, पण आता अखेर २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावर्षी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशीच ‘पुष्पा २ द रूल’मधील (Pushpa 2) अल्लू अर्जुनचा लुक प्रदर्शित करण्यात आला होता.
लाल अन निळ्या रंगाची साडी, बांगड्या आणि इतर आभूषणे, बोटांच्या नखांवर नेलपेंट, गळ्यात हारतुरे आणि लिंबाची माळ आणि नर्तक म्हणून केलेला मेकअप असा अन् रक्ताने माखलेल्या हातात पिस्तूल असा अल्लू अर्जुनचा खास लुक गेल्यावर्षीच समोर आला होता. यावरून बरीच चर्चाही झाली होती.
आता याच लुकमधील ‘पुष्पा २‘ (Pushpa 2) चा पहिला टीझर ८ एप्रिल २०२४ म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी सादर करण्यात आला. टीझरमध्ये या खास अवतारात अल्लू अर्जुन पायात घुंगरू बांधून नाचताना अन् काही लोकांना बेदम मारताना दिसत आहे.
===
हेदेखील वाचा : जगातला एकमेव ‘शापित’ सिनेमा, ज्याने घेतला १०० हून अधिक लोकांचा जीव
===
हा टीजर लोकांना पसंत पडला असून प्रेक्षक आता या सीक्वलची आतुरतेने वाट बघत आहेत. आता या चित्रपटाच्या कमाईबद्दल नवी माहिती समोर आली आहे.
मीडिया रीपोर्टनुसार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २‘चे (Pushpa 2) डिजिटल राईट्स हे शाहरुख खानच्या ‘पठाण‘पेक्षाही अधिक किंमतील विकले गेले आहेत. ‘कोईमोई’ या वेबसाइटच्या माहितीनुसार ‘पुष्पा २’ प्रदर्शनाआधीच १००० कोटींचा गल्ला जमवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
इतकंच नव्हे तर ‘पुष्पा २‘ (Pushpa 2)चे हिंदी भाषेतील हक्क २०० कोटींना आणि तेलुगू भाषेतील हक्क हे २७० कोटींमध्ये विकले गेले आहेत, तर या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय हक्क १०० कोटींमध्ये विकत घेतले गेले आहेत. तर या चित्रपटाचे डिजिटल हक्क, सॅटेलाइट, ऑडिओ आणि म्युझिक राइट हे एकूण ४५० कोटींना विकले गेले आहेत.
या सगळ्या राईट्सची कमाई पाहता ‘पुष्पा २‘ने (Pushpa 2) प्रदर्शनाआधीच १००० कोटींची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा २’ शाहरुख खानच्या ‘जवान’ ‘पठाण’ आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल‘लाही मागे टाकणार हे यावरून स्पष्ट होत आहे. ‘पुष्पा २’ हा येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
याचदिवशी अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडगोळीचा ‘सिंघम अगेन‘सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यंदा साऊथ विरुद्ध बॉलीवूड हे घमासान पाहायला मिळणार आहे. ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते अशी चर्चाही सध्या होताना दिसत आहे. अद्याप अजय देवगण किंवा रोहित शेट्टी यांच्याकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.