Tamannaah Bhatia Summoned: अभिनेत्री तमन्ना भाटियाला सायबर सेलकडून समन्स
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाबद्दल एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. आयपीएलचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं असून यावेळी त्यात तमन्ना भाटिया या अभिनेत्रीचं नाव येत आहे. हे प्रकरण या वर्षीचे नसून २०२३ चे आहे. आयपीएल 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी वायकॉम 18 चे खूप नुकसान झाले आणि आता या प्रकरणात अभिनेत्रीला महाराष्ट्र सायबर सेलच्या माध्यमातून समन्स बजावण्यात आले आहे. आणि तिला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.(Tamannaah Bhatia Summoned)
सध्या आयपीएल २०२४ सुरू असून आतापर्यंत अनेक स्टार्स ते पाहण्यासाठी आले आहेत. यातच आता गेल्या वर्षीचे प्रकरण पुन्हा उसळत आहे, जे बेकायदा स्ट्रीमिंगचे प्रकरण होते. खरं तर ई-वेबसाईट्सवर आयपीएलच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगचं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे वायकॉमला कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र, अभिनेत्रीला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले असून पुढील आठवड्यात तिला सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणी अभिनेता संजय दत्त आणि जॅकलिन फर्नांडिसच्या मॅनेजरचे जबाब नोंदवले आहेत.
महाराष्ट्र सायबर फेअरप्ले अॅपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणात वायकॉमला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणी तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, तमन्नाच्या आधीही या प्रकरणात अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या कलाकारांना फेअरप्ले अॅपच्या माध्यमातून आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगची पूर्वकल्पना होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.(Tamannaah Bhatia Summoned)
=============================
हे देखील वाचा: Shraddha Kapoor बनली सेल्स गर्ल, कमावले इतके पैसे, म्हणाली- ‘सोपे वाटते, पण…’
=============================
यापूर्वी अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी या प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते, पण अभिनेता त्याच्यासमोर हजर झाला नव्हता. यावर संजयने जबाब नोंदवण्याची तारीख आणि वेळ मागितली होती आणि हजर होण्याच्या तारखेबद्दल सांगितले होते की, त्या दिवशी तो भारतात नव्हता.