‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीने केला भाजपमध्ये प्रवेश, म्हणाली- ‘मी पंतप्रधान मोदींची फॅन आहे’
‘अनुपमा‘ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. रुपाली गांगुली या आधीपासूनच भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थक आहेत. यावेळी अभिनेत्रीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप चांगले काम करत आहे म्हणूनच तिने पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली गांगुली पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘एक नागरिक म्हणूनही आपण सर्वांनी यात सहभागी व्हायला हवं. मला त्यांची काळजी आहे आणि जेव्हा मी विकासाचा हा महायज्ञ पाहतो तेव्हा मला वाटते की माझ्याबरोबर का सामील होऊ नये.(Rupali Ganguli Joins BJP)
यासोबतच अभिनेत्री असं ही म्हणाल्या की- ‘मला विनोद तावडेजींचं मार्गदर्शन मिळालं, अमित बिनोनीजींचा आशीर्वाद मिळाला, संजयजींचं मार्गदर्शन मिळालं आणि मोदींनी दाखवलेल्या मार्गावर चालता यावं म्हणून मी इथं आले आहे. मी कोणत्या तरी प्रकारे देशाची सेवा केली पाहिजे. मला आशा आहे की मी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईन आणि आज या लोकांनी मला या पक्षात सामावून घेतले आहे, आणि एक दिवस त्यांना माझा अभिमान वाटेल. मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे की मी जे काही करेल ते मी योग्य प्रकारे करेल आणि चांगले करेल. जर मी काही चुकीचं केलं तर तुम्ही लोक मला नक्की सांगाल.”
रुपाली गांगुलीबद्दल अधिक जाणून घ्यायचे झाले तर तिचा वाढदिवस ५ एप्रिलला असते. अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त नुकतीच मुंबईत एक पार्टी आयोजित केली होती. ज्यात टेलिव्हिजनचे अनेक दिग्गज स्टार आणि त्यांच्या ‘अनुपमा’ या शोची स्टारकास्ट पोहोचली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ हा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यात अभिनेत्री मस्ती करताना दिसत आहे.(Rupali Ganguli Joins BJP)
============================
हे देखील वाचा: Gulabi Sadi Song: ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर…
============================
या पार्टीनंतर अभिनेत्रीने सकाळी इन्स्टा स्टोरीवर एक छोटासा व्हिडिओही शेअर केला होता. जो विमानतळावरचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसते की, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ती दिल्लीत पोहोचली तेव्हा हा शूट करण्यात आला होता.