‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अनेक गाजलेली गाणी दिलेल्या ‘हमजोली’ सिनेमाची ५४ वर्ष !
‘हमजोली‘ चित्रपट मुंबईत गिरगावातील सेन्ट्रल थिएटर येथे २७ मे १९७० रोजी प्रदर्शित झाला. जितेन्द्र, लीना चंदावरकर यांच्या सोबतच प्राण, मेहमूद, शशिकला, मनमोहन, अरुणा ईराणी, नासिर हुसेन, पूर्णिमा, डी.के. सप्रू, सी.एस. दुबे, वी. गोपाल, पाहुणी कलाकार म्हणून मुमताज यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. टी.आर. रमन्ना यांनी दिग्दर्शित या चित्रपटात जीतेंद्र, लीना चंदावरकर अशी जोडी अगदी छानच जमली होती. गावकरी गोपालनाथ (प्राण) नेहमी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असत. मुंबई शहराच्या सहलीला गेल्यावर एका श्रीमंत माणसाची एकुलती एक वारस दार रूपाशी लग्न करण्यास तो तयार होतो तेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण होते. गोपालनाथ हे श्यामा (शशिकला) या गावात राहणार्या तरूणीच्या प्रेमात आहेत, हे रूपाला माहीत नसते.( 54 years of Hamjoli Movie)
रूपाच्या वडिलांच्या निधनानंतर रूपा राणीबाला या मुलीला जन्म देते. आणि दुसरीकडे गोपालनाथ रूपाला मारण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर तो श्यामाशी लग्न करतो आणि राणीबालाला वसतिगृहात ठेवतो. अनेक वर्षांनी श्यामाचा नातेवाईक आणि राणीबाला यांचा लग्नाचा प्रस्तावक मनमोहन (मनमोहन) गोपाळनाथांच्या आयुष्यात प्रवेश करतो. तो तिला ब्लॅकमेल करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आणि अशा रंजक पद्धतीने सिनेमाची कथा पुढे सरकत जाते.
मुमताज ‘टिक टिक मेरा दिल डोले‘ या गाण्यावर यांचा एक रंगतदार क्लब डान्स या चित्रपटात होता. कॅबरे म्हटला कि त्या काळी हेलनला पर्याय नव्हता पण तरी हा नाच मुमताज यांनी केलाय. या चित्रपटाची पटकथा मुखराम शर्मा यांनी लिहिली होती. या चित्रपटातील हाय रे हाय नींद नही आये, ढल गया दिन हो गई शाम, चल शुरू हो जा चला मुक्का, गाँव की मैं गोरी चंदा की चकोरी, ये कैसा आया जमाना, टिक टिक टिक मेरा दिल; ही गाणी खूप गाजली होती.(54 years of Hamjoli Movie)
============================
हे देखील वाचा: ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७ वर्ष !
=============================
या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार, कमल बारोट यांनी गायली होती. आणि या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते, तर गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती.