Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या

‘मुलगी पसंत आहे!’ मधील यशोधरा उर्फ हर्षदा खानविलकर यांच्या चर्चेत राहिलेल्या लूकमध्ये होणार बदल
ज्याच्या मनात आधीपासून खोट असेल किंवा सूड घेण्याची वृत्ती असेल अशा व्यक्तीच्या मनात झालेल्या किंवा केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याचा विचार येईल का? हा साहजिक विचार कोणाच्या डोक्यात आलाच तर एक तर आपला त्यावर विश्वास बसेल अथवा शंका निर्माण होईल. असंच काहीसं झालंय सन मराठी वरील ‘मुलगी पसंत आहे!’ या मालिकेतील आराध्याच्या बाबतीत.(Harshada Khanvilkar New Look)

‘मुलगी पसंत आहे!’ ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. खुप कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अर्थात प्रेक्षकांना मालिका तेव्हाच आवडते जेव्हा मालिकेचा विषय सगळ्यापेक्षा हटके आणि वेगळा असतो आणि या मालिकेच्या प्रत्येक एपिसोड्समध्ये येणा-या टर्निंग पाँईटमुळे, ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता पुन्हा या मालिकेत नवीन घटना पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे यशोधरेचं बदलेलं रुप.

यशोधरा उर्फ अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या पात्राचं जसं रुप बदललं तसं त्यांच्या लूकमध्येही बदल करण्यात आला आहे. हर्षदा यांची यशोधरा पात्राची स्टाईल चर्चेचा विषय बनलेली आणि महिला वर्गाकडून त्यांच्या साड्यांचे पण कौतुक करण्यात आले. आता मात्र यशोधराने स्वत:च्या लूकमध्ये बदल केला आहे, तो बदल देखील प्रेक्षकांना आवडेल याची खात्री वाटते.
=============================
=============================
झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त करायला मनशांती केंद्रात जाण्याचा विचार करणा-या यशोधरेच्या मनात नेमकं काय चालू असेल. खरंच तिला चुकांची जाणीव झाली असेल की आराध्याच्या विरोधात उचललेलं हे तिचं नवीन पाऊल असेल? पण यशोधराला पूर्णपणे ओळखलेल्या आराध्याला मात्र अंदाज आहे की, यशोधराच्या मनात नेमका कशाबद्द्ल डावपेच सुरु आहे. आता असा नवा कोणता खेळ यशोधरा खेळणार हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘मुलगी पसंत आहे!’ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सन मराठी या वाहीनीवर.