Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Mirzapur 3: ठरलं! अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’
काही वेबसीरीज ठीक ठाक चालतात तर काही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय ठरतात. त्यातील कित्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशा वेब सीरीजचा पहिला सीजन संपल्यानंतर प्रेक्षकांना पुढील सीजनची आतुरतेने प्रतिक्षा असते.
यासाठी प्रेक्षकांकडून सतत सर्च सुरु असतो. ‘मिर्झापूर ३‘ (Mirzapur 3) अशाच वेब सीरीज पैकी एक आहे. ॲमेझॉन प्राइमवर या वेबसीरीजचा पहिला सीजन तुफान यशस्वी ठरला होता. त्यानंतर दुसरा सीजन आला आणि आता तिसरा सीजन कधी येणार? याबद्दल लोक प्रचंड उत्सुक होते.
अखेर याच तिसऱ्या सीझनची रिलीज डेट जाहीर झाली आहे.‘मिर्झापूर ३‘ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली.

आता अखेर ही प्रतीक्षा संपली असून ‘मिर्झापूर ३’ (Mirzapur 3) ची कन्फर्म रिलीज डेट समोर आली आहे. येत्या ५ जुलै रोजी ‘मिर्झापूर‘चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या तिसऱ्या सीझनचा टीझर नुकताच समोर आला असून कुलभूषण खरबंदा हे त्यांच्या भारदस्त आवाजात आगामी सीझनमध्ये समोर येणाऱ्या थरारनाट्याबद्दल माहिती देत आहेत.
यामुळे नक्कीच ‘मिर्झापुर ३’च्या (Mirzapur 3) चाहत्यांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. दोन्ही सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही जबरदस्त ड्रामा, थरार, मारहाण, हिंसा तसेच काही बोल्ड सेक्स सीन्सचा भडिमार असणार हे याच्या टीझरवरुन स्पष्ट झालं आहे.
===
हेदेखील वाचा : सॉफ्ट पॉर्न फिल्म्स ते ‘पंचायत’; ‘बनराकस’चा थक्क करणारा प्रवास
===
पंकज त्रिपाठी आणि अली फजल याची ‘मिर्झापूर ३‘ मध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सीजनमध्ये ‘मुन्ना भैया’ म्हणजे दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Mirzapur 3)
‘गुड्डू पंडित’ ने मागच्या सीजनमध्ये गोळ्यांनी त्याच्या देहाची चाळण केली होती. पण कालीन भैया बाचवल्याच स्पष्ट झालं होतं. कालीन भैया म्हणजे पंकज त्रिपाठी. ‘मिर्झापूर’चं (Mirzapur 3) तख्त कोण राखणार? याची लढाई तिसऱ्या सीजनमध्ये सुद्धा अशीच सुरु राहणार आहे.

मिर्झापूर सीझन ३ (Mirzapur 3) चे नवीन पोस्टर देखील समोर आले आहे. या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, अंजुम शर्मा, विजय वर्मा आणि ईशा तलवार दिसत आहेत. गोलू गुप्ताचा म्हणजेच श्वेता त्रिपाठीचा लुकही पूर्णपणे बदललेला दिसत आहे.
या सिरीजमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून आणि टीझरवरून स्पष्ट होत आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘पंचायत’ या लोकप्रिय सीरिजच्या पाठोपाठ ‘मिर्झापुर’ (Mirzapur 3) च्या नव्या सीझनची लोक सर्वात जास्त आतुरतेने वाट बघत आहेत.
आता हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार की त्यांच्या आनंदावर विरझण घालणार हे तो प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल. (Mirzapur 3)