ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
कार्तिक आर्यनच्या Chandu Champion पहिल्या दिवशी केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई
कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनीत ‘चंदू चॅम्पियन’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या चित्रपटासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतली असून चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकती शिखरावर पोहोचली होती. अखेर हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘चंदू चॅम्पियन’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. (Chandu Champion Box Office Collection)
कार्तिक आर्यनस्टारर ‘चंदू चॅम्पियन’ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सुरुवातीचा अंदाज आणि एडवांस बुकिंगनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी खूप चांगले कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जवळपास 4.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामुळे निर्मात्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट साइट सकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी रिलीज झालेल्या चंदू चॅम्पियनला 16.84 टक्के ऑक्युपेन्सी मिळाली होती. 14 जून रोजी चित्रपटगृहात धडकलेल्या या चित्रपटाचा पहिल्या दिवशी कीती कमाई केली हा आकडा आता समोर आला आहे.
चंदू चॅम्पियनने अपेक्षेप्रमाणे चांगली कमाई केली आहे असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही.’चंदू चॅम्पियन’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अनेकांना चंदू चॅम्पियन या सिनेमाला 4/5 रेटिंग दिले आहे. या चित्रपटातील कार्तिकच्या अभिनयाबद्दल ही कौतुक होताना पहायला मिळत आहे. चित्रपटात फ्रीस्टाईल जलतरणपटूची भूमिका साकारण्यासाठी कार्तिकने कठोर प्रशिक्षण घेतले आहे . ज्यात त्याचे वजन 90 किलोवरून 72 किलो पर्यंत आणि त्याच्या शरीरातील चरबी 39% वरून 7% पर्यंत कमी झाली. कार्तिकने नुकताच सोशल मीडियावर लूकच्या आधी आणि नंतरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात चित्रपटासाठी त्याने केलेल ट्रान्सफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे.(Chandu Champion Box Office Collection)
=================================
=================================
कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन या सिनेमाची कथा ‘मुरलीकांत पेटकर‘ यांच्या जीवनावर आधारित आहे. ही कथा आणि व्यक्तिरेखा जगण्यासाठी कार्तिकने जवळपास 2 वर्षे मेहनत घेतली आहे आणि जबरदस्त बॉडी तयार केली आहे. अभिनेत्याने त्याच्या डायलॉग डिलिव्हरीपासून ते त्याच्या शरीरापर्यंत बरेच काम केले होते. मात्र, एवढं करूनही आणि समीक्षकांकडून चांगला रिव्ह्यू मिळूनही कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन‘ हा चित्रपट येत्या काळात हा चित्रपट जबरदस्त कमाई करू शकतो असा विश्वास दर्शवला जात आहे.