मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
Kalki 2898 AD मधील पहिले गाणे ‘भैरव अँथम’चा ऑडिओ करण्यात आले रिलीज
प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दिशा पटानी स्टारर नाग अश्विनचा ‘कल्की 2898 एडी‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सिनेमातील ‘भैरव अँथम’चा प्रोमो रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. इतकंच नाही तर निर्मात्यांनी हे भारतातलं सर्वात मोठं गाणं असल्याचं ही म्हटलं आहे. संपूर्ण गाणे रिलीज होणार असल्याची माहिती पोस्टसह देण्यात आली होती. मात्र, या व्हिडिओच्या आधी ‘भैरव अँथम’चा ऑडिओ रिलीज करण्यात आला आहे. दिलजीत दोसांझचा सुरेल आवाज प्रेक्षकांची मने जिंकत असून हे गाणे यूट्यूबवर पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी ‘कल्की 2898 AD’च्या टीमने ‘भैरव अँथम‘ हे गाणे रिलीज केले. संतोष नारायणन यांनी संगीतबद्ध केलेले हे उत्कट गाणे पंजाबी आणि तेलुगू गाण्यांचे प्रायोगिक मिश्रण असून दिलजीत दोसांझ आणि दीपक ब्ल्यू यांच्या आवाजात आहे.(Bhairava Anthem Release)
हे गाणे तमिळ आणि हिंदी भाषेतही रिलीज करण्यात आले आहे. शनिवारी टीमने याबद्दलचा एक छोटा प्रोमो रिलीज केला होतो ज्याला चाहत्यांनी ही चांगला प्रतिसाद ही दिला होता. निर्माते रविवारी ‘भैरव अँथम’चा व्हिडिओ रिलीज करणार होते, पण नंतर त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत ही वेळ वाढवली. निर्मात्यांनी लिहिले की, “भैरव गीताची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. फक्त थोडा वेळ, आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकता. दरम्यान, आपल्या आवडत्या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ते ऐका. प्रभास एक्स दिलजीत दोसांझ उद्या सकाळी ११ वाजता संपूर्ण व्हिडिओ गाणे येणार आहे.” असे लिहीत त्यांनी पोस्ट शेअर केली होती.(Bhairava Anthem Release)
म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणे रिलीज होताच चाहत्यांनी एक्सवर म्हणजेच आधीचे ट्वीटरवर आपले विचार व्यक्त केले. एका चाहत्याने लिहिले की, “मी सहसा प्रत्येक हिंदी चित्रपटातील पंजाबी गाण्यांचा चाहता नसतो, परंतु या गाण्याचे पंजाबी बोल एकदम विलक्षण आहेत.” या गाण्यासाठी प्रभासने पंजाबी पोशाख परिधान केल्याचे पाहून चाहते खुश झाले आहेत.(Bhairava Anthem Release)
==============================
हे देखील वाचा: चित्रपट कलाकारांची संघर्ष कहाणीवर आधारित वेबसिरिज ‘इंडस्ट्री’चा ट्रेलर प्रदर्शित
==============================
नागचा ‘कल्की 2898 AD’ हा डिस्टोपियन भविष्यावर आधारित चित्रपट आहे. कॅम्पसमध्ये सर्व संसाधने पाठवली जात असताना लोक काशीमध्ये राहण्यासाठी कसे संघर्ष करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात प्रभास एका शिकारीची भूमिका साकारत आहे, जे पाहण्यासाठी लोक कल्कीच्या अवताराची वाट पाहत असतात. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.