Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी लग्नाच्या 6 वर्षांनंतर होणार आई-वडील; गोड फोटो शेअर करत अभिनेत्याने दिली बातमी
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात फेव्हरेट कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. लग्नाच्या 6 वर्षांनंतर प्रिन्स आणि युविकाच्या घरात या बाळाचा कीलकीलाट ऐकु येणार आहे. प्रिन्स नरुला याने ही आनंदाची बातमी देण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी युविकाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या आल्या होत्या, पण या जोडप्याने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. पण आता बिग बॉस 9 च्या कपलने चाहत्यांसोबत एक लांबलचक पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान बिग बॉसच्या एक्स कंटेस्टेंट युविका चौधरी जेव्हा प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने फक्त स्मितहास्य केले. अशातच आता खुद्द प्रिन्सने या बातमीला दुजोरा दिला असून येणाऱ्या पाहुण्यासाठी आपण खूप खूश असल्याचे ही सांगितले आहे.(Prince and Yuvika Announce Their Pregnancy)

नुकताच खुद्द प्रिन्स नरुलाने एक अतिशय क्यूट फोटो शेअर करत आपण लवकरच दोनाचे तीन होणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्याने एका लांबलचक पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की, ”या वेळी तुमच्यासमोर माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे मला कळत नाही, कारण आम्ही खूप आनंदी आहोत, पण त्याचवेळी नर्व्हसही आहोत. आम्ही देवाचे आभारी आहोत, आणि पालक होण्यासाठी देखील उत्सुक आहोत. प्रिविका बेबी लवकरच आमच्या आयुष्यात येणार आहे आणि आता तिच्यासाठी सर्व काही केले जाईल. युविका, तू दुसऱ्या क्रमांकावर येशील आणि माझ्या आई-वडिलांसाठी मी दुसऱ्या क्रमांकावर येईन, कारण आमच्या आयुष्यातील सेंटर अॅाफ अॅटरॅकशन येणार आहे.”

प्रिन्सने पुढे लिहिले की, ‘इतर आई वडीलांसारखे मी पण असे बरेच काही ठरवले आहे की जेव्हा मी वडील बनेन तेव्हा सर्व काही त्याच्यासाठी असावे, जसे सर्व पालकांना वाटते. माझीही ती स्वप्नं होती, जशी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला वाढवले आणि आम्हाला चांगल्या मनाचा आणि चांगला माणूस बनवल. तसाच आपल्या मुलाला एक चांगला माणूस बनवण्याचा आमचा ही प्रयत्न असेल. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही आई-वडील होणार आहोत, तेव्हा उत्साहाच्या वेगवेगळ्या भावना होत्या. आम्हाला सर्व सुख दिल्याबद्दल देवाचे आभार. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि गोड भेट दिल्याबद्दल धन्यवाद बाळा. आता या भेटवस्तूने मी आणि आजी-आजोबा .याला वाढवणार आहोत. बाळा तू त्याला इंग्रजी शिकव, मी त्याला पंजाबी आणि हिंदी शिकवेन. आय लव्ह यू बेबी आणि लक्षात ठेव की काही दिवसांनी तू दुसर्या स्थानावर असशील.”(Prince and Yuvika Announce Their Pregnancy)
===============================
हे देखील वाचा: Big Boss Ott 3: वडा पाव गर्ल आणि रणवीर शौरी यांच्यात जेवणावरून झाले कडाक्याचे भांडण
===============================
प्रिन्स नरुलाच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांसह सेलेब्सही त्याला शुभेच्छा देत आहेत. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात बिग बॉस 9 च्या घरातून झाली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले. मध्यंतरी युविका प्रेग्नेंसीच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या, पण त्या सर्व अफवा ठरल्या. पण, आता या जोडप्याने स्वत: गरोदरपणाची घोषणा केली आहे.