लग्नानंतर झहीर इक्बालने पत्नी सोनाक्षीला दिले २ कोटी रुपयांचे खास गिफ्ट? सोशल मिडियावर होतेय कपल्सची चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल विवाहबंधनात अडकले आहेत. 23 जून 2024 रोजी या दोघांनी लग्न केले आणि सोनाक्षी आणि झहीरच्या कुटुंबीयांनी लग्नाला हजेरी लावली आणि त्यानंतर रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक पाहुणे ही दिसले. सलमान खान, तब्बू, काजोल, अली फजल, ऋचा चढ्ढा पासून हुमा कुरेशी आणि रेखा पर्यंत च्या नावांचा यामध्ये समावेश आहे. आता झहीरने आपल्या पत्नीला म्हणजेच सोनाक्षीला काय गिफ्ट दिलं याची माहीती समोर आली आहे आणि त्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.( Sonakshi Sinha Wedding Gift)
झहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या पतीने तिला एक अतिशय खास आणि अतिशय महागडे गिफ्ट दिले आहे. आणि सोशल मीडियावर याची जोरदाक चर्चा सुरू आहे. 23 जून रोजी सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी नोंदणीकृत विवाह केला होता आणि त्याच दिवशी सोनाक्षी रिसेप्शननंतर सासरच्या घरी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या घरी पोहोचल्यानंतर झहीर इक्बालने बेगम सोनाक्षीला एक महागडी कार गिफ्ट केली आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, झहीर इक्बालने सोनाक्षीला एक नवीन आणि चमकदार लक्झरी सेडान भेट दिली आहे ज्याची किंमत तब्बल 2.05 ते 2.12 कोटी रुपये आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला होतो, जो ‘कार्स फॉर यू’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी आणि झहीर लग्नानंतर बीएमडब्ल्यू आय 7 मध्ये बसलेले दिसत आहेत.
नोंदणीकृत विवाहानंतर सोनाक्षी आणि झहीर रिसेप्शनसाठी बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये जात होते. दोघेही कारच्या मागच्या सीटवर बसले होते. बीएमडब्ल्यूने विकलेली ही देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक सेडान असून पांढऱ्या रंगाची ही टॉप मॉडेलची कार आहे. बॉलिवूड स्टार्समध्ये ती चांगलीच लोकप्रिय आहे.(Sonakshi Sinha Wedding Gift)
================================
================================
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी लग्न केले. आणि सोनाक्षीने लग्नात तिच्या आईची साडी नेसली होती. सोनाक्षी सिन्हाचं लग्न झाल्यापासून वाद सुरू आहे. दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बिहारमध्ये काही लोकांनी तर पोस्टर छापून ही अभिनेत्रीचा निषेध केला होता.