Kalki 2898 AD सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; आतापर्यंत कमावले ‘एवढे’
![अभिनेत्री हिना खानला झाला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रार्थना करण्याची केली विनंती](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/maxresdefault-9-850x560.jpg)
अभिनेत्री हिना खानला झाला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रार्थना करण्याची केली विनंती
‘ये रिश्ता क्या कहलाता है‘, ‘नागिन‘ आणि ‘बिग बॉस‘ यांसारख्या मालिकांमधून आपलं टॅलेंट दाखवणाऱ्या हिना खानच्या चाहत्यांसाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी कठीण काळ सुरु झाला आहे, कारण अभिनेत्री सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही हृदयद्रावक बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिची पोस्ट व्हायरल होत आहे. खरं तर नुकतीच हिना खान कॅन्सरने ग्रस्त असल्याची बातमी आली होती, पण या बातमीवर कुणाचा विश्वास बसला नाही. मात्र आता अभिनेत्रीने स्वत: कॅन्सरच्या आजाराचा खुलासा केल्याने सर्वजण तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.(Hina Khan Diagnosed With Breast Cancer)
![Hina Khan Diagnosed With Breast Cancer](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/maxresdefault-9.jpg)
हीना ने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने सर्व काही सांगितले आहे. हिना खानने लिहिले की, ‘नुकत्याच आलेल्या अफवांवर मी तुमच्यासोबत काही महत्वाची बातमी शेअर करू इच्छिते की मी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मला हिनाहोलिक्स आणि माझ्यावर प्रेम आणि काळजी घेणार्या सर्व लोकांशी काही महत्वाची बातमी शेअर करायची होती. जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझी काळजी घेतात. मला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर आहे. हिना खानने पुढे लिहिले की, ‘असे असूनही मी सर्वांना सांगू इच्छिते की मी ठीक आहे. या आजारावर मात करण्यासाठी मी खंबीर, चिकाटी आणि पूर्णपणे कटिबद्ध आहे. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि मी मजबूत होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहे. यासोबतच अभिनेत्रीने या कठीण काळात स्वतःसाठी चाहत्यांकडून काही प्रायव्हसीची मागणी केली आणि म्हणाली, ‘मला या काळात तुमच्याकडून थोडा आदर आणि प्रायव्हसी हवी आहे.’
![Hina Khan Diagnosed With Breast Cancer](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot-2024-06-28-16.36.45.png)
हिना खानने पुढे असे ही लिहिले की,”या प्रवासात तुमचे वैयक्तिक अनुभव, किस्से आणि सूचना माझ्यासाठी खूप मोलाच्या ठरतील. मी माझे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांसोबत सकारात्मक राहीन. देवाच्या कृपेने मी या आव्हानावर मात करून पूर्णपणे बरे होईन, असा आम्हाला विश्वास आहे. कृपया आपल्या प्रार्थना आणि प्रेम पाठवत रहा.”(Hina Khan Diagnosed With Breast Cancer)
=============================
=============================
हिना खानने ही पोस्ट शेअर करताच तिचे चाहते चिंतेत आहेत. प्रत्येकजण अभिनेत्रीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपल्या स्टायलिश फोटो आणि व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हिना खानबद्दलची ही बातमी हृदयद्रावक आहे. टीव्ही जगतात हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोद्वारे एक खास ओळख निर्माण केली आहे. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.