Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kalki 2898 AD सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी

 Kalki 2898 AD सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी
Kalki 2898 AD Box Office Collection
बॉक्स ऑफिस

Kalki 2898 AD सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी

by Team KalakrutiMedia 03/07/2024

जर तुम्ही अद्याप कल्की 2898 एडी हा सिनेमा पाहीला नसेल तर तुम्ही खरं तर तो पहायला हवा, कारण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत हा सिनेमा मोठा गल्ला कमवत आहे. सोमवार टेस्टमध्ये वीकेंडनंतर चित्रपटाची बॉक्स ऑफिस किती होती हे तुम्हाला समजले तर नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची कमाई रविवारच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. मात्र, त्यानंतरही या अभिनेत्याच्या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली असून सातत्याने नवनवीन विक्रम करत आहे. चला जाणून घेऊया ‘कल्की 2898 एडी‘ प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी किती कमाई केली हे येथे जाणून घेऊया.(Kalki 2898 AD Box Office Collection)

Kalki 2898 AD Box Office Collection
Kalki 2898 AD Box Office Collection

पहिल्या दिवशी ९५.३ कोटींचा बंपर कमावल्यानंतर सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर त्याची हवा कमी होताना दिसली नाही. मंगळवारी म्हणजेच सहाव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 27.85 कोटींची कमाई केली आहे. ही प्राथमिक आकडेवारी आहे जी कमी आणि त्याहूनही जास्त असू शकते. मंगळवारी या चित्रपटाने तेलुगूतूनही चांगली कमाई केली आहे.या चित्रपटाने मंगळवारी तेलुगूमध्ये ११.२ कोटींची कमाई केली, तर हिंदीमध्ये १४ कोटींची कमाई केली आहे. एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले तर कल्की 2898 एडी या चित्रपटाने देशभरात ३७१ कोटींचा गल्ला जमवला असून ६ दिवसांत हिंदी भाषेत आतापर्यंत १४२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Kalki 2898 AD Box Office Collection
Kalki 2898 AD Box Office Collection

अमिताभ बच्चन, कमल हलान, नाग अश्विन यांच्या ‘कल्की 2898 एडी‘ या चित्रपटाने वीकेंडमध्ये भारतातच नाही तर परदेशातही कमाईचे विक्रम मोडले आहेत. सेकनिकच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या चित्रपटाने पाचव्या दिवशी 34 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 5 दिवसांत ‘कल्की 2898 एडी‘ च्या वर्ल्डवाइड कलेक्शनने 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे, ते सगळ्यांनाच आश्चर्यतकीत करत आहे.(Kalki 2898 AD Box Office Collection)

==============================

हे देखील वाचा: अभिनेता इम्रान हाश्मीची मोस्ट अवेटेड सिरीज Show Time चा ट्रेलर प्रदर्शित

==============================

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी‘ हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट अपेक्षेवर खरा उतरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पहिल्या दिवशी म्हणजेच 27 जून रोजी या चित्रपटाने देशभरात 95.3 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यात ३७.७८ टक्क्यांची घसरण ही झाली होती. तर पाचव्या दिवशी त्यात ६१ टक्क्यांची घसरण ही पाहायला मिळाली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood bollywood update Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.