Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

 भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित
Google Aai Marathi Movie Trailer
मिक्स मसाला

भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

by रसिका शिंदे-पॉल 17/07/2024

शोध… भीती… काळजी… वेदना… अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई‘ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक ‘गूगल आई’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. विविध भावनिक छटा उलगडणारा ‘गूगल आई‘ चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत.(Google Aai Marathi Movie Trailer)

Google Aai Marathi Movie Trailer
Google Aai Marathi Movie Trailer

या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  ट्रेलरमध्ये एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब दिसत असून अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात ‘गूगल आई’ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत.

Google Aai Marathi Movie Trailer
Google Aai Marathi Movie Trailer

दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘गूगल आई’च्या निमित्ताने मराठी चित्रपट एका वेगळ्या वळणावर गेल्याचे चित्र आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, ” मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मराठीत एखादी तरी कलाकृती करावी, असे मनात होतेच आणि माझी ही इच्छा ‘गूगल आई’च्या निमित्ताने पूर्ण झाली. खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. परंतु या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. यात या चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल. तिनेही यात कमाल अभिनय केला आहे.”(Google Aai Marathi Movie Trailer)

===============================

हे देखील वाचा: ‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता अंकित मोहनला गंभीर दुखापत

===============================

”चित्रपटाची संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरणारी आहे. ‘गूगल आई’ला थोडा साऊथ टचही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पाहातानाही एक वेगळा अनुभव येईल. तंत्रज्ञानाचा फायदाही आहे, नुकसानही आहे. त्याचा वापर कसा केला जातो, हे महत्वाचे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. थरार, रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.” अशा ही दिग्दर्शक गोविंद वराह यांनी व्यक्त केल्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor pranav raorane actress Actress Prajakta gaikwad Celebrity Celebrity News Entertainment Google Aai Marathi Movie Trailer marathi movie 2024 Marathi Movie google Aai
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.