Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा विशेष भाग…

 ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा विशेष भाग…
Abol Preetichi Ajab Kahani Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा विशेष भाग…

by रसिका शिंदे-पॉल 26/07/2024

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी‘ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय‘ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल‘ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.(Abol Preetichi Ajab Kahani Serial)

Abol Preetichi Ajab Kahani Serial
Abol Preetichi Ajab Kahani Serial

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने‘ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे.

Abol Preetichi Ajab Kahani Serial
Abol Preetichi Ajab Kahani Serial

मयूरी यातून स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.(Abol Preetichi Ajab Kahani Serial)

=============================

हे देखील वाचा: तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सीझन 28 जुलैपासून सुरु होणार

=============================

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी‘ या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.आणि हे सगळं आपल्याला लग्नसोहळा महाएपिसोड, रविवारी रात्री 8 वाजता सोनी मराठीवर पाहाता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abol Preetichi Ajab Kahani Serial actor actress ajinkya raut Dipti Ketkar Janhavi Tambat shivani sonar Sony marathi sony marathi serial Sunil Tawde
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.