दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
फोनवरील एका संवादातून गुलशन बावरा यांना सुचले रोमॅण्टिक गाणे!
कलाकारांच्या प्रतिभेला कधी कधी अचानकपणे काही काळासाठी ग्रहण लागतं आणि काही केल्या काहीच सुचत नाही. प्रतिभा जणू कुंठीत झाल्यासारखी होते. क्रिएटिव्हीटी लोप पावते. काही काळासाठी काही सुचतच नाही ! असा अनुभव बहुतेक सगळ्याच कलाकारांनी घेतलेला असतो. गीतकार गुलशन बावरा (Gulshan bawra) यांच्या एका लोकप्रिय गाण्याच्या बाबत असाच एक प्रकार झाला होता. चित्रपट होता १९८४ साली प्रदर्शित झालेला ‘जवानी’.
हा चित्रपट आज विस्मृतीत गेला असला तरी हे रोमँटिक गाणं मात्र आज देखील सर्वांच्या लक्षात आहे. तब्बल महिनाभर या गाण्याच्या मुखड्यासाठी झटपट करणाऱ्या गुलशन बावरा यांना पंचमच्या एका फोनमुळे आणि त्यातील शब्दांमुळे अवघ्या दहा मिनिटात त्यांचं गाणं तयार झालं! कोणतं होतं ते गाणं? आणि काय होत हा नेमका किस्सा?
हा इंटरेस्टिंग किस्सा गुलशन बावरा यांनी रेडिओवरील एका मुलाखतीत सांगितला होता. मुळात हे गाणं या चित्रपटात आधी नव्हतच. हे गाणं असणार होतं अमिताभ बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात. या चित्रपटातील अन्य सर्व गाणी जवळपास तयार झाली होती आणि पंचम आणखी एका गाण्याची ट्यून बनवत होते. सोबत म्युझिक अरेंजर मनोहरी सिंग देखील होते. पंचमने गाण्याची एक मस्त रोमँटिक ट्यून तयार केली. मनोहर सिंग यांना देखील ती आवडली. गुलशन बावरा (Gulshan bawra) यांच्याकडून या ट्यूनवर मस्त शब्द लिहून घेऊ असं ठरलं.
पण मनोहरी सिंग म्हणाले, ”पंचमदा, ही रोमँटिक ट्यून या ‘सत्ते पे सत्ता’ सिनेमासाठी नको!” पंचम म्हणाले, ”काय प्रॉब्लेम आहे?” त्यावर मनोहर सिंग म्हणाले, ”ही ट्यून खूपच हळुवार आहे. नाजूक आहे. या सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टर हे रफ आणि टफ आहे. त्यामुळे या चित्रपटात ही धून मिसफिट वाटेल. आपण पुढे कधी तरी ती वापरुयात.” पंचम यांना मनोहर सिंग यांचे बोलणे पटले आणि त्यांनी ही धून आणि त्याचे नोटेशन्स तसेच ठेवले. ‘सत्ते पे सत्ता’ रिलीज झाला. हिट झाला.
पण या सिनेमाच्या दरम्यान तयार झालेली ही ट्यून मात्र तशीच होती. ती वापरण्याची संधी त्यांना आणखी एक दोन वर्षानंतर आली. रमेश बहल एक रोमँटिक चित्रपट बनवत होते ‘जवानी’. करण शहा आणि नीलम ही जोडी यात होती. या सिनेमासाठी त्यांनी ही ट्यून वापरायचे ठरवले. पंचम यांनी गुलशन बावरा यांना फोन केला आणि म्हणाले, ”गुल्लू, अरे यार हमने ‘सत्ते पे सत्ता’ फिल्म के टाइम जो ट्यून बनायी थी ना उस पर गाना बनाने का अभी समय आया है. तुम इस पर अच्छे वर्ड्स लिख दो!” गुलशन बावरा (Gulshan bawra) देखील खुश झाला. ट्यूनवर गाणे लिहायला त्याला फारसा वेळ लागायचा नाही. पण या गाण्याने मात्र त्याला खूप सतावले. त्याला या गाण्याचा मुखडा आणि शब्द काही केल्या मिळत नव्हते. सिनेमातील गाण्याची सिच्युएशन, गाण्यातील भावना हे सर्व दिग्दर्शकांनी सांगितले होते त्या पद्धतीने गुलशन बावराने गाण्याचे अंतर लिहून काढले पण मुखडा मात्र काही केल्या त्याला मना जोगता मिळत नव्हता.
तिकडे दिग्दर्शक आणि संगीतकार यांचे रोज फोन गुलशन बावराला होत होते. पण गुलशनला (Gulshan bawra) मात्र काही केल्या शब्द सुचत नव्हते. शेवटी पंचमदा वैतागले त्यांनी गुलशनला फोन केला आणि म्हणाले, ”यार गुल्लू, तुझसे ये गाना ये साल मे भी पूरा हो गा की नही? ऐसा करते है ये गाना ड्रोप करते है मुझे लगता है गाना तुझसे नही होगा” हे शब्द ऐकल्यानंतर गुलशन पंचमला म्हणाला, ”मुझे इस गाने के मुखडे के लिये अच्छे शब्द नही मिल रहे है” पंचम आता वैतागला होता तो म्हणाला, ”इसलिये तो कह रहा हु. ये गाना छोड देते है. नया कुछ करते है. छोड दे” असे म्हणून त्यांनी नाराजीने फोन ठेवून दिला!
==========
हे देखील वाचा : ज्या गाण्याला निर्माते बकवास म्हणाले; तेच गाणं ठरलं सुपरहिट !
==========
पण यातूनच गुलशन बावरा यांची प्रतिभा जागृत झाली. त्यांनी लगेच पंचमला फोन केला आणि सांगितले, ”यार तू रूठ मत. जल्दी गाना बना ता हूं” आणि पुढच्या दहा मिनिटात गाणं तयार झालं. त्यांनी पुन्हा पंचमला फोन केला आणि म्हणाले, ”पंचम दा गाना तैय्यार है’ पंचमदा म्हणाले, “गुल्लू, मजाक मत कर यार. अभी तो कह रहा था गाना नही बन रहा और अभी कहता है गाना बन गया? सुनाव जरा “त्यावर गुलशन बावरा (Gulshan bawra) म्हणाले, ”तू रुठा तो मै रो दूंगी सनम आजा मेरी बाहों मैं आ…” पंचमला हा मुखडा प्रचंड आवडला लगेच त्यांनी आशा भोसले आणि अमित कुमारला बोलावले आणि गाण्याची रेकॉर्डिंग करून घेतले. आज चाळीस वर्षे झाली ‘जवानी’ हा चित्रपट कोणाला आठवत नाही पण अमित कुमार आणि आशा भोसले आणि गायलेलं सर्वांना एक मस्त रोमँटिक सॉंग या निमित्ताने बॉलीवूडला मिळाले!