Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धेत अरुंधती-मिहीर मारणार बाजी!

 ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धेत अरुंधती-मिहीर मारणार बाजी!
Aai Kuthe Kay Karte Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धेत अरुंधती-मिहीर मारणार बाजी!

by रसिका शिंदे-पॉल 05/08/2024

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक. सध्या या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उस्तुकता नेहमीच प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला आहे. अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही. प्रत्येक संकटाचा तिने जिद्दीने सामना केला.(Aai Kuthe Kay Karte Serial)

Aai Kuthe Kay Karte Serial
Aai Kuthe Kay Karte Serial

सध्या या मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यातला असाच एक महत्त्वाचा टप्पा आई कुठे काय करते मालिकेत सध्या सुरु आहे. देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे. समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती. त्यामुळेच तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेत मिहीर शर्मासोबत सहभाग घेतला. 

Aai Kuthe Kay Karte Serial
Aai Kuthe Kay Karte Serial

अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले. अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको. अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले. मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे. अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणासाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.(Aai Kuthe Kay Karte Serial)

=============================

हे देखील वाचा: ‘अबीर गुलाल’ मालिका रोमांचक वळणावर! श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण…

=============================

अरुंधतीच्या आयुष्यातला हा विजय महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांना संघर्षाचं नवं बळ देणारा ठरेल यात शंका नाही. अरुंधतीचा विजेतेपदाचा हा प्रवास अनुभवायचा असेल तर आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला स्टार प्रवाह या वाहीनीवर दुपारी २.३० वाजता पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aai kuthe kay karate Aai Kuthe Kay Karte Serial Actor Hrishi Saxena Actress Madhurani gokhale Celebrity Entertainment madhurani gokhale madhurani prabhulkar Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.