Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वैभव चव्हाण आणि फॉरेन गर्ल पडले प्रेमात?

 वैभव चव्हाण आणि फॉरेन गर्ल पडले प्रेमात?
टीव्ही वाले

वैभव चव्हाण आणि फॉरेन गर्ल पडले प्रेमात?

by Jyotsna Kulkarni 06/08/2024

बिग बॉस म्हटले की, डोळ्यासमोर येतात ती अगणित भांडणं, वाद, विविध कबुली आणि मुख्य म्हणजे अनेक प्रेम प्रकरणं. आजवरच्या बिग बॉसच्या इतिहासात असा एकही सिझन गेला नाही ज्यात कोणते प्रेम प्रकरण घडले नाही. या घराने अनेक जोड्या बनवल्या. काही टिकल्या तर काही घरातच किंवा शो संपल्यानंतर लगेच तुटल्या. एकूणच काय तर बिग बॉसचे घर हे अनेकांसाठी प्रेमाच्या बाबतीत लकी ठरले आहे.

आता मराठी बिग बॉसचेच घ्या ना. मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन सुरु होऊन जेमतेम दहा दिवस देखील झाले नाही तोपर्यंत घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यामध्ये अरबाज आणि निक्की यांच्या वाढत्या जवळीकने चांगल्याचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या मैत्रीवर किंवा सतत एकमेकांच्या सोबत राहण्यावरून सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या.

आता मात्र अजून एका जोडीची यात भर पडली आहे. जिच्या चर्चा घरातील सदस्यांमध्ये होताना दिसत आहे. ही जोडी आहे, अभिनेता वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा. सोशल मीडियावर सध्या एक प्रोमो कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत असून, वैभव तिच्याशी अनेक खास बाबी देखील बोलताना दिसत आहे.

BB Marathi 5

व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये वैभव इरिनाला म्हणतो, “कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होत आहे.”. त्यावर इरिना ‘हो’ असे उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते, “फॉरेनची पाटलीन मस्त आहे”. तर निक्की वैभवला म्हणते,”भाई…तुझं काय चालल आहे.”

========

हे देखील वाचा : बिग बॉस मराठी : कोण होणार घराचा पहिला कॅप्टन?

========

वैभव आणि इरिनाच्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. यात अनेकांनी वैभवला “निक्की अरबाजचा बैल” म्हटले आहे तर काहींनी “इरिना याच्या नादाला लागू नकोस” असे म्हणत त्याला सल्ला देखील दिला आहे. काहींनी “रांगडा गडी नव्हे तो बैल आहे”, “वैभवला सगळ्यात आधी नॉमिनेट करा” अशा कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान आता खरंच इरिना आणि वैभव यांच्यामध्ये काही चालू आहे की नाही हे तर येणाऱ्या काळात समजेल. कारण अनेकांनी इरिनाचे नाव सुरजसोबत जोडले आहे. त्यामुळे आता नक्की इरिनाची जोडी सुरज बरोबर जमते की, वैभवसोबत हे पाहायला सगळ्यांना खूपच मजा येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss Marathi Big Boss Marathi 5 Vaibhav Chavan And Irina Rudakova Vaibhav Chavan And Irina Rudakova Special Bond इरिना आणि वैभव बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी ५
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.