नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
दाक्षिणात्य अभिनेते नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आणि आता याच चर्चांना आता पूर्ण विराम लागले आहे. गुरूवारी सकाळी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हा दोघे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि त्याच्या काही वेळातच नागार्जुनने आपल्या सोशल मीडियावर मुलगा आणि सून शोभिता धुलिपालाचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना माहिती दिली की, दोघांनी साखरपुडा केला आहे.(Naga Chaitanya and Sobhita Engagement)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी अखेर साखरपुडा केला आहे. गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी या जोडप्याने एकमेकांना अंगठी घातली होती. साखरपुड्यानंतर काही तासांतच त्यांचे वडील सुपरस्टार नागार्जुन यांनी आपल्या एक्स हँडलवर या जोडप्याचे पहिले अधिकृत फोटो शेअर केले. त्यांनी मुलगा आणि सुनेचे अभिनंदन केले आणि सोभिताचे कुटुंबात स्वागत केले. नागार्जुनने लिहिले की, “आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुखी जोडप्याचे अभिनंदन! त्याला आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो हीच शुभेच्छा. देव आशीर्वाद दे! ८.८.८ शाश्वत प्रेमाची सुरुवात. ‘
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते आणि आता 8 ऑगस्टला अखेर त्यांनी साखरपुडा करत गोड बातमी दिली. नागार्जुनने आपल्या सोशल मीडियावर मुलगा आणि सून शोभिता धुलिपाला यांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. आणि त्यासोबत एक खास नोटही लिहिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोभिता आणि नागा अभिनेत्याच्या घरी एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कुटुंबीय आणि खास लोक आले होते आणि आता साखरपुड्याच्या विधीनंतर नागार्जुनने या समारंभाचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.(Naga Chaitanya and Sobhita Engagement)
=============================
हे देखील वाचा: Shraddha Kapoor आणि Rahul Modi यांचे ब्रेकअप? सोशल मिडीयावर आले चर्चांना उधाण
=============================
नागा चैतन्यने 2017 मध्ये अभिनेत्री समंथा रूथ प्रभूसोबत लग्न केले होते, परंतु त्यांचे नाते काही वर्षेच टिकले. 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नात खूप पैसे खर्च झाले होते, पण काही वर्षांतच हे नातं तुटलं आणि त्यानंतर समंथ तिच्या आजाराशी झुंज देत आहे आणि नागा तिच्या आयुष्यात पुढे गेला आहे.