दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राजेश खन्ना आणि अमिताभ या दोन सुपरस्टार्सला अक्षरशः डांबून शूटिंग पूर्ण केले!
सत्तरच्या दशकातील दोन सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अमिताभ बच्चन या दोघांनी केवळ दोन चित्रपटात एकत्र भूमिका केल्या. योगायोगाने दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. यातील दुसरा चित्रपट होता १९७३ सालचा ‘नमक हराम’. त्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार पदाच्या उच्च स्थानी होता. त्या काळात त्याचे नखरे आणि त्याच्या इतर गोष्टींची खूप चर्चा त्या काळच्या सिने मॅगझिन होत असे. त्याच्या तुलनेने अमिताभ बच्चन यांना अजून स्टारडम मिळायचा होता. ‘नमक हराम’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या दरम्यानचा हा किस्सा आहे.
ऋषिकेश मुखर्जी यांचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबदबा एवढा प्रचंड होता की, त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार अक्षरशः तरसत असे. ‘नमक हराम’ चित्रपटाच्या दरम्यान एकदा ऋषिकेश मुखर्जी यांनी रागा रागाने शूटिंग होत असलेल्या स्टुडिओचा दरवाजा आतून बंद करून टाकला होता आणि तब्बल सात आठ तासानंतर तो उघडला होता! दोन सुपरस्टार्सला अक्षरशः कैद करून त्यांनी एक गाणं चित्रित केलं होतं. ज्या काळात राजेश खन्ना बाबत असं म्हटलं जायचं ‘उपर आका और नीचे काका’ त्या काळात ऋषिदांनी ही कृती केली होती! काय होत हा नेमका किस्सा? याच चित्रपटात काम करणारे रजा मुराद यांनी विविध भारतीवरील एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
‘नमक हराम’ या चित्रपटात एक मुजरा डान्स होता. आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी हा मुजरा गायला होता आणि चित्रपटात जयश्री टी आणि सहकलाकारवर तो चित्रित केला होता. या गाण्याच्या सीनमध्ये राजेश (Rajesh Khanna) आणि अमिताभ दोघे कोठीवर हा मुजरा पाहायला जातात असा होता. त्या मुळे या दोघांना सबंध गाण्याच्या शूटच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक होते. ऋषिकेश मुखर्जी यांनी मोहन स्टुडिओमध्ये सेट लावला होता आणि शूटिंग सुरू करायचे होते. त्या काळात मोबाईल वगैरे काही नव्हते. त्यामुळे कोणाचा तरी फोन आला तरी ऑफिसमध्ये यायचा आणि ज्याचा फोन असेल त्याला तिथे जाऊन तो घ्यावा लागायचा. राजेश खन्नाचेसारखे फोन येत असायचे आणि त्याला ऑफिसमध्ये जाऊन फोन घ्यावा लागत असे.
ऋषिकेश मुखर्जी सेटवर आले आणि म्हणाले ‘चलो शूटिंग शुरू करते है काका किधर है?” प्रोडक्शनच्या एका व्यक्तीने सांगितले, ”त्यांचा फोन आलाय. ते घ्यायला गेले.” आता राजेश खन्नाचा (Rajesh Khanna) फोन म्हणजे बराच वेळ चालला. फोन संपवून जेव्हा राजेश खन्ना आला तेव्हा नाराजीने ऋषिकेश मुखर्जी म्हणाले, ”क्या राजेश, कितने देर तक फोन पर बात करते हो. तुम्हे मालूम है प्रोड्युसर का कितना नुकसान होता है? एक मिनिट का चार हजार रुपये का नुकसान होता है. कुछ तो लिहाज करो.” ऋषिदाची डेअरिंग पहा. राजेश खन्नाने डोळ्याने सॉरी म्हटलं.
मग त्यांनी, ”अमित किधर है ?” असे विचारले. प्रोडक्शनच्या लोकांनी सांगितले, ”आता त्याचा फोन आलाय.” ऋषिकेश मुखर्जी यांनी कपाळाला हात लावला. अमिताभ बच्चन आल्यानंतर पुन्हा ऋषिकेश मुखर्जी यांनी त्याची सर्वांसमोर शाळा घेतली आणि सर्वांना सांगितले, ”आता बास. मी आता या शूटिंगच्या स्टुडिओच्या दाराला आतून मी कुलूप लावत आहे. पूर्ण गाणे चित्रित झाल्याशिवाय हे कुलूप उघडले जाणार नाही!!”
===========
हे देखील वाचा : गीतकार आनंद बक्षी भर पावसात बोरीवली ते सांताक्रुझ चालत गेले !
===========
आणि पुढचे सात आठ तास या गाण्याचे शूट झाले. शूटिंग संपल्यावरच रात्री ती साडेबारा वाजता स्टुडिओचा दरवाजा उघडला गेला! राजेश आणि अमिताभ दोन सुपर स्टारला ऋषिकेश मुखर्जी यांनी चक्क डांबून ठेवले आणि चित्रीकरण पूर्ण केले. या मुलाखतीत रजा मुराद यांनी सांगितले ‘सेटवर शिस्त कडवी होती पण वातावरण मात्र एकत्र कुटुंबासारखे असायचे. त्यामुळे कदाचित त्यांच्या सिनेमांमध्ये तो फॅमिली फ्लेवर यायचा.”
ऋषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमात दिलीप कुमार (मुसाफिर) अमिताभ बच्चन (आनंद, नमक हराम, चुपके चुपके, मिली, आलाप, जुर्माना,बेमिसाल) देव आनंद (असली नकली) राज कपूर (अनाडी) संजीव कुमार (सत्यकाम) राजेश खन्ना (Rajesh Khanna) (अशा आनंद, नमक हराम, बावर्ची) या दिग्गजांसोबत काम केले आहे!