Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट सांगणारी ‘पाणीपुरी’

 प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट सांगणारी ‘पाणीपुरी’
कलाकृती तडका

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट सांगणारी ‘पाणीपुरी’

by Jyotsna Kulkarni 19/09/2024

पाणीपुरी म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. तिखट, गोड, आंबट, चटपटीत असणारी ही पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या सर्वच चवींनी प्रत्येकालाच आपलेसे करून सगळ्यांच्या आवडीची असणारी ही पाणीपुरी म्हणजे आपल्या आयुष्यातील नातीच असतात.

मनुष्याच्या आयुष्यातील नाती देखील अशीच असतात. काही गोड, काही तिखट तर काही आंबट. प्रत्येक नात्याची स्वतःची एक चव असते, स्वतःची एक ओळख असते. या वेगवेगळ्या चवींमुळेच नात्यांची एक गंमत,मजा असते. नात्यातील प्रेम टिकते, आपलेपणा वाढतो. अशा या हटके नात्यावर आधारित एक भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटले की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटले की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटते आणि मनालाही ती खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सर्वजण प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.

‘पाणीपुरी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर विशाखा सुभेदार आणि इतर काही कलाकार दिसत आहे. खुर्चीवर बसलेले मकरंद देशपांडे दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतर कलाकार दिसत आहेत. आता हे पोस्टर पाहून चित्रपटात काय नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी.. अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

==============================

हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…

==============================

मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला चाखायला देणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने शिवाली परब पुन्हा चित्रपटात सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: makarand deshpande panipuri movie vishakha subhedar पाणीपुरी पाणीपुरी सिनेमा मकरंद देशपांडे विशाखा सुभेदार
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.