जेव्हा दिग्दर्शकाने सेटवर तनुजाच्या श्रीमुखात लगावली!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात जेव्हा आपण शूटिंगचे किस्से ऐकतो तेव्हा हिरोईनच्या tantrams अर्थात नायिकांच्या नखऱ्यांची खूप चर्चा होते. सेट वरील त्यांचा तोरा, नखरा प्रोडक्शनला दिलेला त्रास यावर खूप काही छापून यायचे. बऱ्याचदा हिरोईनसोबत तिची आईदेखील असायची ते एक वेगळेच रसायन असायचं. त्यांच्या सरबराईसाठी वेगळा माणूस प्रोडक्शनला द्यावा लागायचा. पण असं असताना देखील काही किस्से असे असतात जे याच प्रकरणाची वेगळी बाजू देखील आपल्यासमोर आणतात. (Tanuja)
हा किस्सा १९६० सालचा आहे. त्यावेळी निर्माता दिग्दर्शक किदार शर्मा ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. या चित्रपटाचा नायक त्यांचा मुलगा अशोक शर्मा होता तर नायिकेच्या भूमिकेत तनुजा (Tanuja) होती. तनुजाचा हा दुसरा चित्रपट. यापूर्वीचा तिचा चित्रपट ‘छबिली’ होता. जो तिच्या आईने शोभना समर्थ यांनी बनवला होता. त्यामुळे पहिल्या चित्रपटाचा अनुभव काही फार काही विशेष नव्हता. पण किदार शर्माच्या चित्रपटाची शिस्त होती. केदार शर्मा हिंदी सिनेमातील अतिशय बुजुर्ग आणि रिस्पेक्टेबल असे दिग्दर्शक. त्यांना सेटवर अजिबात नखरे चालत नसायचे.
या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एका शॉट मध्ये तनुजाला रडण्याचा अभिनय करायचा होता. पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही; तनुजाला (Tanuja) रडताच येत नव्हतं. त्या ऐवजी ती चक्क हसत होती. त्यामुळे सर्व शूटिंगचा खोळंबा होत होता. प्रत्येक वेळेला दिग्दर्शक कटकट म्हणून पुन्हा एकदा शॉट घेत होते. पण प्रत्येक वेळी तनुजा (Tanuja) रडण्याच्या ऐवजी तनुजा चक्क खि-खि करून हसत होती. किदार शर्मा यांनी दोन-तीनदा तिला समजावून सांगितला पण तिच्यात काहीच बदल होत नव्हता. सकाळी सुरू झालेला शॉट दुपारी लंच पर्यंत चालला पण काहीही शूट झालं नाही.
आता मात्र किदार शर्मा थोडेसे चिडले. त्यांनी सांगितलं, ”हे बघ या शॉटमध्ये तुला रडायचं आहे. खूप इमोशनल शॉट आहे. तू मन लावून अभिनय कर. हा तुझा दुसराच चित्रपट आहे. तुला सर्व प्रकारचा अभिनय यायलाच पाहिजे!” तनुजाने (Tanuja) देखील हो म्हटले. ग्लिसरीन डोळ्यात टाकले गेले. ‘लाईट कॅमेरा ऍक्शन’ असे म्हटल्यावर कॅमेरा रोल झाला. पण पुन्हा तनुजाच तेच. ती खि-खि करून हसायला लागेली. आता मात्र किदार शर्मा प्रचंड संतापले. ते समोर आले आणि सर्वांच्या समोर तनुजाच्या थोबाडीत लगावली !!!
आपल्या सिनेमाच्या प्रमुख हिरोईनच्या थोबाडीत मारणे हे मोठे धाडसाचं काम होतं! पण किदार शर्मा हे शिस्तप्रिय माणूस होते. त्यांनी सकाळपासून तनुजाला हर तऱ्हेने समजावून सांगितलं होतं. पण ज्यावेळी ती ऐकतच नाही असं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांचादेखील तोल राहिला नाही. त्यांची लिमिट संपली आणि त्यांनी सर्वांच्या समक्ष तनुजाला (Tanuja) थप्पड मारली. तनुजा आता मात्र घाबरली , रडू लागली. ती लगेच सेट सोडून आपल्या गाडीत जाऊन बसली. आणि थेट आपल्या घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने तिच्या आईला (शोभना समर्थला) मला केदार शर्मा यांनी थोबाडीत मारले असे सांगितले.
किदार शर्मा शोभना समर्थांच्या लक्षात आले की आपली मुलगी काही गुणाची नाही. आणि किदार शर्मा हे प्रतिभावान दिग्दर्शक आहेत. ते विनाकारण कुठली कृती करणार नाहीत. तरी त्यांनी सेटवर फोन करून एका कलाकाराकडून सर्व हकीकत समजावून घेतली आणि जेव्हा तिला या प्रकरणातील तथ्य समजले. तिने तनुजाला (Tanuja) गाडीत कोंबले आणि सरळ सेटवर ती घेऊन आली आणि सर्वांच्या समक्ष तिने किदार शर्मा यांना सांगितले की, ”किदार, तुम्हाला पूर्ण हक्क आहे तुमच्या या हीरोइनकडून व्यवस्थित काम करून घेण्याचा आणि ती जर व्यवस्थित काम करत नसेल तर तिच्यावर हात उचलायला माझी काही काहीच हरकत नाही. आज तिला जर सुधारले तरच चांगली अभिनेत्री होऊ शकते त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे तिच्याकडून काम करून घ्या.”
===============
हे देखील वाचा : गीताबालीने दिला होता राजेश खन्नाला आत्मविश्वास!
===============
तनुजाला (Tanuja) आधी किदार शर्माकडून आणि नंतर आईकडून सर्वांसमक्ष झालेल्या कानउघाडणीने तिने आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले. किदार शर्मा यांनी चाळीसच्या दशकात राजकपूर जेव्हा त्यांच्याकडे सहायक होता तेंव्हा त्याच्या देखील श्रीमुखात लगावली होती! (Tanuja)