Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली !

 पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली !
Gulaabi Marathi Movie Pune Rally
मिक्स मसाला

पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली !

by रसिका शिंदे-पॉल 14/11/2024

पुणे शहरातील महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशन अंतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या अनोख्या रॅलीत ‘गुलाबी’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रुती मराठेने सहभाग घेतला होता. महिलांनी गुलाबी रंगाच्या पारंपरिक पेहरावात सजून आपल्या दुचाकींसह रॅलीत सहभाग घेतला आणि चित्रपटाच्या गुलाबी थीमला उजाळा दिला. रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथून झाली, ज्यात महिलांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रॅलीचा मार्ग करिष्मा चौक, सीडीएसएस चौक, आणि डीपी रोड मार्गे शुभारंभ लॉन्स येथे समाप्त झाला. गुलाबी फेटे घातलेल्या महिलांनी आणि दुचाकींवरून निघालेल्या या रॅलीने पुण्याच्या रस्त्यांवर एक वेगळीच रंगत आणली होती.(Gulaabi Marathi Movie Pune Rally)

Gulaabi Marathi Movie Pune Rally
Gulaabi Marathi Movie Pune Rally

रॅलीनंतर मंदार बलकवडे आयोजित ‘गुलाबी Live’ कार्यक्रमात चित्रपटातील संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात संगीत मैफलीचे सादरीकरण करण्यात आले. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवादाने कार्यक्रमाला एक वेगळा रंग दिला. श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी यांच्यासह कार्यक्रमात आदिती द्रविड, अभ्यंग कुवळेकर आणि सावनी राजेंद्र, हंसिका अय्यर, संगीतकार साई – पियुष यांनीही सहभाग घेतला. यावेळी चित्रपटातील गाण्यांसह इतर गाण्यांची मेजवानी होती. 

Gulaabi Marathi Movie Pune Rally
Gulaabi Marathi Movie Pune Rally

‘गुलाबी’ हा चित्रपट जयपूरच्या पार्श्वभूमीवर तीन मैत्रिणींच्या आयुष्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा प्रवास मांडतो. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “हा चित्रपट फक्त मैत्रीवर आधारित नसून, तर स्त्रियांच्या वैयक्तिक संघर्षांवर, त्यांच्या स्वप्नांवर आणि आत्मसन्मानाच्या शोधावर आधारित आहे. आम्ही या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे.”(Gulaabi Marathi Movie Pune Rally)

===============================

हे देखील वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नवीन सीझनच्या शुटिंगला  सुरुवात; प्राजक्ता माळीने  शेअर केला व्हिडीओ

===============================

चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट सादर केला आहे. या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार आणि निखिल आर्या यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साई-पियुष यांनी संगीत दिलेले आहे.‘गुलाबी’ चित्रपट हा २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या रॅली व ‘गुलाबी Live’ कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता वाढली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress ashwini bhave Celebrity Entertainment Gulaabi Marathi Movie Pune Rally gulaabi marathi movue gulaabi rally Marathi Movie Shruti Marathe
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.