Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

शाहरुख खानची घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण
बॉलिवूडचा मेगास्टार शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. त्याचे सिनेमे प्रदर्शित होत असले तरी आणि नसले तरी शाहरुख सतत या ना त्या कारणाने प्रकाशझोतात असतो. शाहरुख खांसाठी मागील वर्ष खूपच खास गेले. बऱ्याच काळाने त्याचे एकाच वर्षात पठाण, जवान आणि डंकी हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले आणि तिन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. आता पुन्हा एकदा शाहरुख चर्चेत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकतीच शाहरुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याचा मुलगा आर्यन खान लवकरच मनोरंजनविश्वात पदार्पण करत असल्याची माहिती दिली.
बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचे पदार्पण हे काही आता कोणाला नवीन राहिलेले नाही. या क्षेत्रात अनेक स्टार किड्स येतात आणि आपले नशीब अजमावतात. या आयडीमध्ये आता किंग खान शाहरुख खानच्या लेकाची अर्थात आर्यन खानची भर पडणार आहे. मागील अनेक काळापासून आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा कानावर येत होत्या.

आर्यन खान अभिनयात येणार की दिग्दर्शनात ही देखील चर्चा पाहायला मिळाली. मात्र आता शाहरुख खानने पोस्ट शेअर करत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याने त्याच्या पोस्टमध्ये आर्यनच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. शाहरुखने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “हा एक खूपच खास दिवस आहे.. जेव्हा प्रेक्षकांसमोर एक नवीन कहाणी सादर केली जात आहे.. आजचा दिवस अधिकच खास आहे कारण रेड चिलीज आणि आर्यन खानने त्याच्या आगामी नवीन सीरिजचा प्रवास सुरु केला आहे. अतिशय सुंदर बाब आहे… आर्यन तू असाच पुढे जात रहा आणि प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करत रहा…आणि लक्षात ठेव की, मनोरंजनासारखा दुसरा चांगला व्यवसाय कोणताच नाही.”
याशिवाय नेटफ्लिक्सने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “नेटफ्लिक्सने रेड चिलीज एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे आणि हे दोघे लवकरच एक वेब सीरिज घेऊन येत आहोत, जी गौरी खान निर्मित आणि आर्यन खान दिग्दर्शित असणार आहे.”

या मोठ्या घोषणेनंतर शाहरुख खानच्या फॅन्सची उत्सुकता कमालीची वाढली आहे. कमेंट्स करत ते आर्यांच्या शो साठी उत्सुक असल्याचे सांगत आहे. आता हा शो २०२५ मध्ये कधी येणार?, त्यात कोण कोणते कलाकार आपल्याला पाहायला मिळणार?, कथा काय असणार?, शाहरुख मुलाच्या शोमध्ये दिसणार का? आदी सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहे. मात्र हा शो पुढील वर्षी २०२५ मध्ये येणार हे कन्फर्म आहे.
मीडियामध्ये येणाऱ्या माहितीवरून आर्यन खानच्या या वेब सीरिजचे नाव ‘स्टारडम’ असेल असे सांगितले जात आहे. याशिवाय या सिरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत असेल असे सांगितले जात आहे. दरम्यान या भव्य प्रोजेक्टची घोषणा या आठवड्यात लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली होती. आता या प्रोजक्टची नवीन माहिती कधी समजेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.