Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची निरोपाची भावुक पोस्ट

 ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची निरोपाची भावुक पोस्ट
टीव्ही वाले

‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची निरोपाची भावुक पोस्ट

by Jyotsna Kulkarni 20/11/2024

मालिकांवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना एखादी मालिका आवडली की ते तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. मालिका पुढे जाऊन काही महिन्यात, वर्षात संपनार आहे हे माहित असूनही ते मालिका अगदी मनापासून बघतात आणि तिच्याशी एकरूप होतात. सध्या मराठी टेलिव्हिजनविश्व गाजवणाऱ्या अनेक मालिका आहेत. मात्र एका मालिकेने मराठी प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पडला आहे. आणि ती मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका मालिका नाही तर एक इमोशन बनली आहे.

मराठी प्रेक्षकांमध्ये कदाचित अमराठी लोकांना देखील ही मालिका माहित आहे. या मालिकेचे प्रेक्षक फक्त महिला नाही तर अनेक पुरुष देखील आहे. ऑफिसमध्ये, घराघरांमध्ये, कट्ट्यावर आदी अनेक ठिकाणी मालिकेबद्दल चर्चा रंगताना दिसतात. टीआरपीमध्ये देखील ही मालिका कायम टॉपवर राहिली. मात्र आता आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका संपणार म्हणून प्रेक्षक आणि कलाकार देखील दुःखी आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेतील कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अशातच मालिकेत यश ही भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या मालिकेसंदर्भात एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

अभिषेक देशमुखने समृद्धी बंगल्याबाहेरील फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, “गूड बाय यश अरुंधती देशमुख…’आई कुठे काय करते’च्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस…२०१९ ते २०२४…१४९१ भाग…पॅकअप! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, पाच वर्षांपासून सोबत असलेलं ‘कुणीतरी’ आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती…निघताना भेटीगाठी झाल्या, आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं…कुणाला तरी भेटायचं राहिलंय असं वाटतच होतं…शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो, मेकअप रूममध्ये, आरशात बघून आलो…पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो…बॅग जराशी जड वाटत होती…निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’ माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक…त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.

मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार…त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे”, असं शहाण्यांना वाटत असेल…पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं…‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं…ओळख दिली…अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक, आपलेपणा, आशीर्वाद उर्जा देणारे होते…टीव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते…आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे, कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं.

हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन…नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं..त्याच बरोबर आमचे निर्माते राजन शाही यांचे खूप खूप आभारी आहे… तसंच सर्वात मोठा आभारी स्टार प्रवाहचा…सतीश राजवाडे, आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर, सुबोध बरे, तुषार विचारे, रोहित पाटील आमचे डीओपी राजू देसाई, राजेश मोहीते, एडिटर, कला दिग्दर्शक, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर-गाडगीळ, तुषार जोशी आणि अरुंधतीपासून जानकीपर्यंत सगळे कलाकार.”

दरम्यान १९ नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता. येत्या ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. अतिशय लोकप्रिय झालेली ही मालिका संपणार असल्याने कलाकारांसोबतच प्रेक्षक देखील भावुक झालेले दिसत आहे. याआधी देखील मालिकेतील इतर कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aai kuthe kay karte abhishek deshmukh shared emotional post actor actor abhishek deshmukh Celebrity Marathi Movie अभिषेक देशमुख अभिषेक देशमुख पोस्ट आई कुठे काय करते यश देशमुख
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.