Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
2024 Flashback २०२४ वर्षात ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी बांधली लगीनगाठ
सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक हिंदी कलाकार विवाहबंधनात अडकत असून, त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. लवकरच आपण २०२४ या वर्षाला निरोप देऊन २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत, त्याच पार्श्वभूमीवर आपण २०२४ या सरत्या वर्षाचा आढावा घेत आहोत. हे वर्ष सगळ्यांसाठी अतिशय चांगले आणि आनंदमयी गेले. या यावर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी लगीनगाठ बांधली. चला जाणून घेऊया २०२४ मध्ये लग्न केलेल्या कलाकारांबद्दल. (2024 Flashback )
अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता, निर्माता जॅकी भगनानी (Rakul Preet Singh And Jackky Bhagnani) यांनी २१ फेब्रुवारी २०२४ मध्ये गोव्यात अतिशय खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. ते लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. (Bollywood Tadka)
आमिर खानची मुलगी आयरा खानने ३ जानेवारी २०२४ रोजी फिटनेस कोच नुपूर शिखरेशी (Ira Khan and Nupur Shikhre) नोंदणी पद्धतीने लग्न केले. या लग्नाची खूपच चर्चा झाली. कारण या लग्नासाठी नुपूर रनिंग करत आला आणि थेट त्याने रजिस्टर मॅरेज केले. यानंतर, १० जानेवारी २०२४ रोजी उदयपूरमध्ये या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग केले. (Entertainment mix masala)
बॉलीवूडचे लाडके कपल, क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट (Kriti Kharbanda And Pulkit Samrat) हे १५ मार्चला लग्नबंधनात अडकले. पुलकितचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाआधी त्यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले होते. (Bollywood Masala)
गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना गुपचूप डेट करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (Sonakshi Sinha Zaheer Iqbal) यांचा जून महिन्यात विवाह झाला. जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत त्यांनी रजिस्टर मॅरेज केले.
२०२४ वर्षातले सर्वात गाजलेले आणि अतिशय मोठे भव्य लग्न म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani And Radhika Merchant) यांचे. १२ जुलै रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला. याआधी अनेक महिने त्यांचे लग्नाचे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी पार पडले होते. या लग्नासाठी देशातलेच सेलिब्रिटी, राजकारणी नव्हे तर जगभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ (Aditi Rao Hydari and Sidharth) यांनी सप्टेंबर महिन्यात गुपचुप लग्न केले. १६ सप्टेंबर रोजी तेलंगणातील ४०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्या दोघांनी पुन्हा लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला (Naga Chaitanya Shobitha Dhulipala) यांचे ४ डिसेंबरला लग्न पार पडले. काही महिन्यांपर्वी त्यांचा साखपुडा झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये त्या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह केला.
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने (Surbhi Jyoti) देखील तिचा मित्र आणि व्यावसायिक असलेल्या सुमित सूरी (Sumeet Suri) शी लग्न केले. सुरभीने कुबुल हैं, नागीण आदी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले.
टीव्ही अभिनेत्री असलेल्या आरती सिंगने (Arti singh) देखील व्यावसायिक दीपक चौहानसोबत (Deepak Chauhan) लग्न केले. तिचे लग्न खूपच गाजले. आरतीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आणि बिग बॉसमध्ये देखील ती सहभागी झाली होती.