Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास
2024 Year End : २०२४ सालात ‘या’ कलाकारांच्या घरी झाले नवीन पाहुण्याचे आगमन
२०२४ हे वर्ष आज संपून उद्यापासून आपण २०२५ या नवीन वर्षात पाऊल ठेवणार आहोत. २०२४ या वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात घडल्या. मात्र सर्व काही स्वीकारत आपण नवीन वर्षात नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहोत. मनोरंजनविश्वासाठी देखील २०२४ हे वर्ष संमिश्र होते. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे फ्लॉप ठरले तर छोटे, स्मॉल बजेट सिनेमे हिट झाले. (2024 Year End)
मात्र व्यावसायिक आयुष्य कलाकारांचे कसेही असले तरी अनेक कलाकारांसाठी २०२४ हे वर्ष वैयक्तिकदृष्ट्या खूपच चांगले आणि कायमस्वरूपी स्मरणात राहील असे गेले. यावर्षात अनेक कलाकार आई बाबा झाले. या २०२४ वर्षाचा मागोवा घेत असताना जाणून घेऊया, यावर्षात कोणते कलाकार आई-बाबा झाले आहेत ते. (Bollywood Tadka)
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukon and Ranveer Singh) हे यावर्षी आईबाबा झाले. दीपिकाने सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या लेकीचं नाव दुआ असं ठेवले आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohali) यांच्या घरी देखील याचवर्षी चिमुकल्याचे आगमन झाले. अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. त्याचे त्यांनी अकाय असे नाव ठेवले आहे. याआधी त्यांना ‘वामिका’ नावाची एक मुलगी देखील आहे. (Entertainment mix masala)
वरुण धवन आणि नताशा दलाल
बॉलिवूडमधील हँडसम हंक अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Varun Dhawan and Natasha Dalal) २०२४ साली एका मुलीचे पालक झाले. ३ जूनला वरुणची पत्नी नताशा दलालने मुलीला जन्म दिला. वरुणने आपल्या मुलीचे नाव लारा ठेवले आहे. (Bollywood Masala)
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर
७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अभिनेत्याने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे.
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा
फॅशन डिझायनर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता आणि पती सत्यदीप मिश्रा (Masaba Gupta and Satyadeep Mishra) आई-बाबा झाले आहेत. मसाबाने ११ ऑक्टोबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
यामी गौतम आणि आदित्य धर
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि चित्रपट निर्माता आदित्य धरच्या (Yami Gautam and Aditya Dhar) घरी चिमुकल्या सदस्याचे आगमन झाले आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यामीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी ‘वेदविद’ ठेवले आहे.
रिचा चड्डा आणि फली फजल
रिचा आणि फली फजल यांना २०२४ साली एक मुलगी झाली. १६ जुलैला रिचा आणि अलीला मुलगी झाली. दोघांनी आपल्या मुलीचं नाव ‘जुनैरा इदा फैजल’ असं ठेवले आहे.
यासोबतच टेलिव्हिजन विश्वात देखील अनेक कलाकार देखील आईबाबाझाले आहेत. यात दृष्टी धामी, श्रद्धा आर्या, युविका चौधरी, सना सय्यद, मोहिना कुमारी, स्मृती खन्ना, देवोलिना भट्टाचार्या आदी अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.