Pooja Sawant संक्रांतीसाठी आतुर असलेल्या पूजा सावंतने पोस्ट केला हलव्याच्या
Gurmeet Choudhary फिटनेससाठी अभिनेता गुरमीत चौधरीने केला दीड वर्षापासून भात, पोळी, साखरचा त्याग
कलाकारांना नेहमीच सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती त्यांच्या फिटनेसची. या इंडस्ट्रीमध्ये कलाकरांना काम मिळण्यासाठी त्यांच्या प्रतिभेसोबतच त्यांच्या फिटनेसची देखील गरज असते. प्रत्येक भूमिकेनुसार कलाकरांना त्यांच्या फिटनेसमध्ये बदल करावा लागतो. काही भूमिकांसाठी त्यांना वजन वाढवावे लागते तर काही भूमिकांसाठी कमी करावे लागते. यासाठी कलाकरांना नेहमीच त्यांचा फिटनेस जपावा लागतो. (Entertainment News)
कलाकार फिटनेस जपण्यासाठी अनेक तास व्यायाम करतात. यासोबतच त्यांना अनेक त्यांच्या आवडीच्या गोष्टींवर पाणी सोडावे लागते. गोड पदार्थ किंवा वजन वाढवणारे पदार्थ हे कलाकार प्रकर्षाने टाळतात. काही कलाकार त्यांचे डाएट भूमिकेपुरतेच करतात तर काही कलाकार कायम स्वरूपी किंवा काही वर्षांसाठी त्यांचे डाएट फॉलो करतात. (Celebrity Interviews)
असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपण रोज जे अन्न खातो अर्थात भात, पोळी, साखर हे त्याने जवळपास मागील दीड वर्षांपासून खाल्लेले नाही. हा अभिनेता आहे गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary). टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी माध्यम गाजवणारा गुरमीत हा त्याच्या लुक्समुळे आणि त्याच्या कमालीच्या फिटनेसमुळे खूपच लोकप्रिय आहे.
गुरमीत अनेकदा सोशल मीडियावर त्याचे व्यायामाचे, फिटनेसचे बरेच व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या गुरमीत त्याच्या आगामी ‘ये काली काली आंखें 2’ या वेबसिरीजमुळे खूपच चर्चेत आला आहे. या वेबसिरीजमधील भूमिकेसाठी त्याने खूपच मेहनत घेतली आहे. खासकरून आपल्या फिटनेसवर त्याने खूपच लक्ष दिले. (Artist’s Diet)
गुरमीतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या डाएट आणि फिटनेसवर भाष्य करताना सांगितले की, त्याने भात, साखर आणि पोळी तब्बल दीड वर्षांपासून खाल्लेली नाही. गुरमीत चौधरी या मुलाखतीमध्ये म्हणाला, “खरं सांगायचे तर डाएट खूपच कठीण असते. पण मी दीड वर्षापासून साखर, पोळी, भात किंवा ब्रेड खाल्लेले नाही. प्रत्येक भूमिकेसाठी कलाकाराला स्वतःला मानसिकरित्या तयार करावे लागते. हेच जास्त महत्वाचे असते. मी खूपच फुडी आहे, मला खायला फार आवडते, पण मी अशा क्षेत्रात आहे जिथे मला तेच सोडावे लागत आहे. (Gurmeet Chaudharis Diet Plan)
मी जवळपास दीड वर्षे फक्त एकाच पद्धतीचे बनलेले आणि उकडवलेले अन्न खात आहे. या अन्नाला चव नसते, पण हळुहळू मला या अन्नाची सवय झाली आणि ते बेचव अन्न आता मला चविष्ट वाटू लागले आहे. आता मी जर कोणतेही अनहेल्दी पदार्थ खाल्ले, तर मला ते आवडत नाही. (Ankahi Baatein)
मी तूप खाऊ शकतो, पण ते देखील जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर त्याचा देखील माझ्या शरीराला त्रास होतो. मी माझ्या जेवणाचा वेळा खूपच काटेकोर पद्धतीने पाळतो. काहीही झाले तरी मी माझ्या वेळेत जेवतो म्हणजे जेवतोच. रोज मी चार वाजता उठतो आणि रात्री साडेनऊ वाजता झोपतो.” यावेळी गुरमीतने हे देखील सांगितले की, या डाएटमुळेच तो एवढा फिट आणि ऊर्जावर्धक आहे. (Social News)
दरम्यान गुरमीतबद्दल बोलायचे झाले तर, त्याने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून, तो खूपच लोकप्रिय अभिनेता होता. त्याला त्याच्या पहिल्याच ‘रामायण‘ या मालिकेने अभूतपूर्व प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली त्यानंतर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. सध्या तो ओटीटीवर सर्वात जास्त सक्रिय दिसत आहे.