Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
Pooja Sawant संक्रांतीसाठी आतुर असलेल्या पूजा सावंतने पोस्ट केला हलव्याच्या दागिन्यांचा व्हिडिओ
आपल्या पूर्वजांनी मोठा विचार करून आपले सण साजरे करण्यामागे काही विशिष्ट रीती मांडल्या आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक सण साजरा केला जातो. आणि प्रत्येक सणाला एक विशेष महत्व असते. त्यातही जर नवीन लग्न झाले असेल तर अशा नवीन वधूंसाठी वर्षभर साजरे करण्यात येणारे सणवार अधिकच खास होऊन जातात. (Marathi News)
लग्नानंतर साजरी करण्यात येणारी पहिली मकर संक्रात (Makarsankrant) देखील खूपच विशेष असते. या संक्रांतीच्या दिवशी नव्या नवरीला काळी साडी नेसवून, हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकूचा समारंभ केला जातो. पहिली संक्रांत खूपच खास असल्याने ती साजरी करण्यासाठी प्रत्येक नववधू उत्सुक देखील असते. (Indian Festival)
अशीच पहिल्या संक्रांतीसाठी मराठी मनोरंजनविश्वातली एक अभिनेत्री आतुर झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिची उत्सुकता बोलून दाखवली आहे. ही अभिनेत्री आहे, सगळ्याची लाडकी पूजा सावंत (Pooja Sawant). पूजाने मागच्यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियामधील सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली होती. (Pooja Sawant News)
यंदा ती तिची पहिली संक्रांत साजरी करणार आहे. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या हलव्याच्या दागिन्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “वेध…पहिल्या मकरसंक्रांतीचे” तिची ही पोस्ट सध्या खूपच गाजत आहे. सोबतच तिने व्हिडिओमध्ये दाखवलेले तिचे हलव्याचे दागिने देखील खूपच सुंदर आहे. या व्हिडिओसोबतच पूजाने तिच्या मांगसूत्राचा एक सुंदर फोटो देखील पोस्ट केला आहे. (Entertainment Mix Masala)
पूजाच्या या व्हिडिओवरून आणि पोस्टवरून आपल्याला लक्षात आलेच आहे की, ती तिच्या संक्रांतीसाठी किती उत्सुक आहे. दरम्यान पूजाबद्दल सांगायचे झाले तर मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूजा उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. (Pooja Sawant Post)
पूजाने मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला कमालीची फॅन फॉलोविंग असून, तिच्या प्रत्येक सिनेमाची तिच्या फॅन्सला आतुरता असते. पूजाने आतापर्यंत दगडी चाळ, क्षणभर विश्रांती, नीलकंठ मास्टर, पोस्टर बॉइज, बसस्टॉप, लपाछपी आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या लपाछपी या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळाला आहे.
=========
हे देखील वाचा : Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
Actor Yash कन्नड मालिकांचा हिरो ते ग्लोबल स्टार; जाणून घ्या केजीएफ अभिनेता यशचा अभिनय प्रवास
=========
पूजाने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. तिने मुंबईमध्ये अतिशय सुंदर अशा समारंभामध्ये दणक्यात लग्न केले. पूजाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ कमालीचे व्हायरल झाले होते.