Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Sunny Deol : या अभिनेत्यांमध्ये तब्बल सोळा वर्षांचा अबोला होता.
ख्रिसमसचा मुहूर्त साधून २४ डिसेंबर १९९३ रोजी प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा (Yash Chopra) दिग्दर्शित ‘डर’ या सिनेमाने हिंदी सिनेमाच्या दुनियेत त्या काळात मोठी हलचल निर्माण केली होती. शाहरुख खान याने या चित्रपटात रंगवलेला सायको निगेटिव्ह शेडचा नायक जबरदस्त होता. Shah Rukh Khan, जूही चावला आणि सनी देओल यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरहिट झाला. शाहरुख खानचा मार्केटमधील भाव एकदम वाढला गेला.

पण तुम्हाला माहिती आहे का? अभिनेता सनी देओल (Sunny Deol) मात्र हा चित्रपट करताना प्रचंड नाराज होता! इतका की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल सोळा वर्ष तो शाहरुख खानसोबत बोलत देखील नव्हता. काय कारण होते याचे? एका सिने मॅगझीन दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, “या चित्रपटातील मी रंगवलेले कॅरेक्टर एका कमांडोचे होते; आणि चित्रपटातील प्रत्येक फाईट सीनमध्ये जर शाहरुख खान मला हरवत असेल तर मला कमांडो बनवलंच का?” सनी देओल यांचा प्रश्न अगदी लॉजिकल होता. चित्रपट हिरो ओरिएंटेड पाहिजे हे जरी ठीक असलं तरी त्यात काहीतरी लॉजिक पाहिजे यावर सनी देओल यांचा भर होता. या चित्रपटाचा क्लायमॅक्स स्वित्झरलँडला चित्रित केला होता.
त्यावेळी रागाने बेभान झालेला शाहरुख खानचे कॅरेक्टर सनी देओल (Sunny Deol) वर चाकू घेऊन हल्ला करतो. खरं तर कुठल्याही कमांडोची नजर ही बेरकी असते. आपल्या जवळपास होणाऱ्या प्रत्येक हालचाल तो टिपत असतो. “असे असताना एक पोरसवदा तरुण माझ्यावर चाकून हल्ला करतो. हे पटत नाही. यात माझ्या व्यक्तिरेखा पेक्षाही कमांडो या कम्युनिटीच मोठा अपमान आहे. सिनेमांमध्ये नायकाचा विजय नक्की करा. काही प्रॉब्लेम नाही. पण त्यावेळी किमान काहीतरी लॉजिक वापरायला पाहिजे. यश चोप्रा यांच्यासोबत माझा या प्रसंगावरून भरपूर वाद झाला परंतु ते ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी माझे दोन्ही हात जीन्समध्ये होते. रागाच्या भारत मी माझा खिसा फाडला होता!” अशी एक गमतीशीर आठवण देखील त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानची सांगितली आहे.
अलीकडे सनी देओल (Sunny Deol) ने दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये त्याने पुन्हा सांगितले, ”माझ्यात आणि शाहरूखमध्ये अबोल होता पण भांडण नव्हते. माझा वाद तात्विक होता आणि योग्य कारणासाठी होता. हिरोइझम नावाखाली आम्ही काहीही दाखवतो हे पटत नाही. अमरीश पुरीसारख्या बलदंड शरीराच्या अभिनेत्याला कुणीतरी काडी पहालावन फायटिंगमध्ये हरवतो हे त्या मुळेच हास्यास्पद होतं. दुसरं मुळात मी जास्त लोकांशी फारसा काही मिक्स होत नाही. पार्टी वगैरे अटेंड करत नाही. मी काहीसा इंट्रोव्हर्ट स्वरूपाचा व्यक्ती आहे. त्यामुळे शाहरुख खान यांना स्वतःहून फोन करणे. त्यांना भेटायला जाणे असले प्रकार मला कधी जमले नाही!” अर्थात काळ बदलला की टोकाची भावना बोथट होते.

एका सिनेमाच्या मुहूर्त प्रसंगी हे दोघे तब्बल सोळा वर्षानी एकत्र आले आणि त्यांच्यात संवाद प्रस्थापित झाला. सनी देओल (Sunny Deol) यांचा ‘गदर – 2’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि शाहरुख खान याने ट्विटरवर या चित्रपटाची तोंड भरून कौतुक केले होते. त्यानंतर यांच्यातील संबंध थोडे सुधारले. पण ‘डर’ या चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा सनी देओल यांना अजिबात आवडली नव्हती हे नक्की. सनी त्या मुलाखतीत असे देखील म्हणाले होते, ”जर टाईम मशीनमध्ये जावून मला आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळालं तर मी ‘Darr’ सिनेमा स्विकारण्याची ही चूक पुन्हा कधीच करणार नाही!”
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : ‘या” गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
=============
सनी(Sunny Deol) -शाहरुख पुन्हा कधीच एकत्र आले नाही तसेच सनी पुन्हा कधी चोप्रा कॅम्पसमध्ये दिसला नाही. ‘डर’ या सिनेमातील शाहरुखची भूमिका आधी संजय दत्त, आमीर खान, अजय देवगण, सुदेश बेरी यांना ऑफर झाला होता. जुही चावलाचा रोल आधी श्रीदेवी, माधुरी, दिव्या भारतीला ऑफर झाला होता. खरं तर यश चोप्रा यांचे चिरंजीव आदित्य चोप्रा यांना नायिकेची भूमिका रविना टंडनला द्यायचा विचार होता. १९९१ चा हॉलीवूड पट Cape Fear वर या सिनेमाचे कथानक बेतले होते. ज्यात प्रमुख भूमिकेत रॉबर्ट द नीरो होते!