Jitendra Joshi जितेंद्र जोशीने ‘माझी माणसं’ म्हणत शेअर केली खास
Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास
बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय करण्याआधी मनोरंजनविश्वातच विविध विभागांमध्ये अनेक प्रकारची कामं केली आहेत. याकाळात त्यांनी कॅमेऱ्याच्या मागे राहून सर्व प्रक्रिया पहिली त्यानंतर त्यांनी अभिनयामध्ये एन्ट्री केली. असाच एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra).
बॉलिवूडमधील हँडसम हंक अशी ओळख असलेला सिद्धार्थ आजच्या पिढीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आज सिद्धार्थ त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म १६ जानेवारी १९८५ रोजी दिल्लीत माजी नौदल अधिकारी (Navy Officer) सुनील (Sunil) आणि रीमा (Reema) यांच्या घरी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सिद्धार्थचा जन्म दिल्लीत झाला आणि येथूनच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केले आहे. (Sidharth Malhotra Birthday)
सिद्धार्थ अभ्यासात जास्त हुशार नव्हता. त्याला अभ्याससोडून सर्व आवडायचे. तो नववीत नापास झाल्यानंतर त्याला त्याच्या आईने चप्पलांनी मारले होते. त्याच्या घरच्यांना नेहमीच त्याच्या भविष्याची काळजी होती. सिद्धार्थ आयुष्यात जास्त काही करू शकत नाही असेच सर्वांना वाटायचे. (Sidharth Malhotra Journey)
सिद्धार्थने स्वतःचा खर्च भागवण्यासाठी खूपच कमी वयात अर्थात १८ व्या वर्षीच दिल्लीमध्ये मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्याने अनेक वर्ष मॉडेलिंग केली. पुढे तो मुंबईमध्ये आला आणि इथे त्याला मॉडलिंगमध्ये चांगलेच यश मिळू लागले. त्याने द मॅनहंट पेजेंट आणि द ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हे किताब आपल्या नावावर केले. (Bollywood Entertainment Masala)
मॉडलिंगमध्ये यश मिळवून देखील तो फारसा खुश नव्हता. त्याला अभिनयात करियर करायचे होते. मॉडेलिंग करत असताना त्याला मधुर भांडारकरच्या (Madhur Bhandarkar) ‘फॅशन‘मध्ये प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) विरुद्ध मुख्य भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली .यामागे एक कारण देखील होते. ते म्हणजे त्याने आधीच एका मासिकाबरोबर करारामुळे सिद्धार्थ त्या चित्रपटात काम करु शकला नाही. (Sidharth Malhotra Ankahi Baatein)
मात्र यानंतर त्याने अभिनयातच काम करण्याचे ठरवले. मात्र त्याला संधी मिळत नव्हती. पुढे त्याने अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मॉडेलिंग सोडले. त्यानंतर सिद्धार्थला २००९ मध्ये छोट्या पडद्यावरील ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान‘ (Dharti Ka Veer Yodha Prithviraj Chauhan) मध्ये जयचंदची छोटी भूमिका मिळाली. या शोनंतर सिद्धार्थने अनुभव सिन्हाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली. या चित्रपटात त्याला तीनपैकी एक लीड मिळाली. चित्रपटाचा कॉन्ट्रेक्ट झाला मात्र त्यानंतर हा चित्रपट रखडला. (Bollywood Masala)
मॉडेलिंग करत असताना सिद्धार्थची ओळख प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत (Manish Malhotra) झाली होती. याचा फायदा त्याला झाला आणि त्याने धर्मा प्रोडक्शनसोबत काम करण्यास सुरुवात केली. धर्मामध्ये सिद्धार्थ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. त्याने पहिल्यांदा करण जोहर दिग्दर्शित ‘माय नेम इज खान’मध्ये ट्रेनी असिस्टंड डायरेक्टर म्हणून काम केले. या चित्रपटात वरुण धवनही त्याच्यासोबत ट्रेनी असिस्टंड डायरेक्टर म्हणून काम करत होता.
पुढे काही काळाने धर्मा प्रोडक्शनने ‘स्टुडंट ऑफ द इयर‘ (Student of the Year) चित्रपटासाठी ऑडिशन सुरु केल्या. तेव्हा त्याने ही ऑडिशन दिली. त्याने जवळपास तीन दिवस ऑडिशन दिली मग त्याची निवड झाली. त्याच्यासोबत वरुण आणि आलिया देखील या सिनेमासाठी निवडले गेले. आधी हा सिनेमा चालणार नाही अशा प्रकारच्या अनेक चर्चा मीडियामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये झाल्या मात्र सिनेमा दणक्यात चालला आणि सिद्धार्थ, वरुण आणि आलिया यांचे खूप कौतुक देखील झाले.
या सिनेमानंतर सिद्धार्थने मागे वळून पाहिले नाही. त्याने हसी तो फसी, एक व्हिलन, अय्यर, ब्रदर. जेंटलमन, कपूर अँड सन्स, बार बार देखो, जबरिया जोडी, मरजावा, शेरशहा, थँक गॉड आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच त्याने ‘द पोलीस फोर्स’ या सिरीजमध्ये ओटीटीवर देखील यशस्वी एन्ट्री केली आहे. सिद्धार्थने ना केवळ त्याच्या लुक्सने मात्र त्याच्या प्रतिभेने लोकांना आकर्षित केले. आज सिद्धार्थ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जातो. (Sidharth Malhotra Movies)
सिद्धार्थचे नाव त्याच्या करियरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्याने अनेक अभिनेत्रींना देखील डेट केले आहे. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या आणि आलिया भट्टच्या नात्याची. सिद्धार्थ आणि आलिया अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र त्यांचे नाते तुटले. मग शेरशहा सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी जवळ आले आणि प्रेमात पडले. पुढे त्यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले.
===============
हे देखील वाचा : Kranti Redkar “माझ्या मुलींचा बाबा….” लग्नाच्या वाढदिवसाच्या क्रांती रेडकरने शेअर केली खास पोस्ट
===============
एका वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्राची संपत्ती सुमारे $20 दशलक्ष अर्थात १५० कोटींपेक्षा जास्त आहे. तो आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये घेतो. चित्रपटांव्यतिरिक्त, सिद्धार्थ ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. प्रत्येक जाहिरातीसाठी सिद्धार्थ ५ ते ७ कोटी रुपये घेतो. सिद्धार्थकडे ‘मर्सिडीज बेंज एमएल 350 4मॅटिक’, ‘ रेंज रोव्हर वोग’, बीएमडब्ल्यू या कारसोबतच ‘हार्ले-डेव्हिडसन डायना फॅट बॉब’ ही बाइक देखील आहे.