Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Amitabh Bachchan यांचा ‘कालिया’: ‘जहां तेरी ये नजर है मेरी

Sonali Bendre : शर्मिला ठाकरेंचा फोन आणि ‘ती’ अट;काय घडलं

Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Milind Gawali ‘आईची निष्पाप भक्ती’ पत्राद्वारे व्यक्त करताना मिलिंद गवळी भावुक

 Milind Gawali ‘आईची निष्पाप भक्ती’ पत्राद्वारे व्यक्त करताना मिलिंद गवळी भावुक
टीव्ही वाले

Milind Gawali ‘आईची निष्पाप भक्ती’ पत्राद्वारे व्यक्त करताना मिलिंद गवळी भावुक

by Jyotsna Kulkarni 16/01/2025

आजची आधुनिक पिढी अनेक गोष्टींनी मुकली आहे, असे अनेकदा आपल्याला वाटत असते. जुन्या पिढीतील अशीच एक गोष्ट म्हणजे पत्र. पूर्वीच्या काळी आपल्या दूरवर असलेल्या आपल्या लोकांशी संवादाचे आणि संदेशवहन करण्याचे मुख्य साधन होते ते पत्र. मात्र आज फोन, इमेल आणि मोबाइलमुळे पत्र विस्मरणात गेले आहे. (Milind Gawali)

मात्र सध्या जर आपण पाहिले तर सोशल मीडियावर अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर पत्र लिहिताना दिसत आहे.त्यामुळे पत्र पुन्हा एकदा ट्रेंड करताना दिसत आहे. अनेक कलाकार त्यांच्या आयुष्यातील विविध लोकांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

पुन्हा पत्र चर्चेत येण्याचे कारण म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळच्या (Myra Waikul) ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ (Mukkam Post Devache Ghar) हा चित्रपट. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अगदी सामान्यांपासून ते मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी आपल्या मनातील भावना देवासमोर पत्राद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत.अशातच मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी देखील त्यांच्या आईला पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या मिलिंद यांचे हे पत्र कमालीचे व्हायरल होत आहे. (Milind Gawali Post)

“मुक्काम पोस्ट देवाचं घर.
ज्या माणसांमध्ये Innocence असतं त्या माणसाला देव लवकर पावतो, जी माणसं हुशार असतात किंवा अति हुशार असतात, त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात, देव आहे की नाही आहे. कधी कधी मला असं वाटतं की अशा अति हुशार लोकांच्या समोर प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याला प्रश्न विचारून विचारून ते देवालाच भंजाळून सोडतील. (Entertainment News)

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मी माझ्या आजीची आणि माझ्या आईची निरागस निष्पाप देव भक्ती पाहिली आहे, त्या दोघींना काही हवं असेल तर ते कोणाकडेही मागत नसे, एखादा मंदिरात जाऊन त्या मूर्ती समोर एक नवस बोलत असे, मग देवाला सांगितलेलं काम पूर्ण झालं किंवा ती वस्तू त्यांना मिळाली, की मग नवस फेडायला जायचं आहे, या गोष्टीचा हट्ट करायच्या.

महिना दोन महिने सतत नवस फेडायला जायचं आहे हा विषय काढायच्याच, मग काय मी पण जायचो त्यांच्याबरोबर त्यांनी बोललेला नवस फेडायला. मग ते शिर्डी असो शेगाव असो अक्कलकोट असो गाणगापूर असो कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची महालक्ष्मी असो, पंढरपूरचा विठ्ठल असू दे, त्यांच्याबरोबर माझं सुद्धा महाराष्ट्रातल्या असंख्य देवस्थानांचं दर्शन घडायचं. (Marathi Movie News)

माझी सहल किंवा पिकनिक सोमेश्वर त्रंबकेश्वर सज्जनगड अष्टविनायक मुंबई त सिद्धिविनायक महालक्ष्मी, गणेशपुरी चा नित्यानंद बाबांचे मंदिर इथेच असायची, देवीला खूप आधीच साडी, खण, घेऊन ठेवलेली असायची, मग पुजाऱ्याला थोडं पैशाचा आमिश देऊन देवीला ती नेसवली जायची. आणि माझ्या आईचे 90-95% नवस तर माझ्यासाठीच असायचे.

आणि आज मी जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा जे काही माझ्या आयुष्यात घडून गेलंय किंवा जे काही घडतंय, हे त्या परमेश्वरी शक्ती शिवाय अशक्यच होतं, काल असंच मला निष्पाप निरागस व्हायची संधी मिळाली, सुबोध बारे यांचा फोन आला आणि “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या आगामी मराठी चित्रपटातल्या मायरा सारखं ‘देवाच्या घरी’ पत्र पाठवायची संधी मिळाली, मग काय मी लगेच माझ्या आईला पत्र लिहिलं.

“मुक्काम पोस्ट देवाचं घर”नावाचा गोड निरागस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कथा दिग्दर्शक संकेत माने, निरागस मायरा, मंगेश देसाई, सविता मालपेकर, प्रथमेश परब असे अनेक गोड कलावंत या चित्रपटात आहेत, आता परत एकदा आपल्या सगळ्यांना innocent होण्याची गरज आहे, या internet च्या राक्षसामुळे आपण सगळेच “अति” हुशार, अति शहाणे झालो आहोत, OTT वरचा रक्तपात, विभत्स, अश्लील बघून झालं असेल, तर आता “मुक्काम पोस्ट देवाचं घर” बघूया का ?”

===============

हे देखील वाचा : Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास

Vijay Sethupathi टेलीफोन बूथ ऑपरेटर ते पॅन इंडिया स्टार जाणून घ्या विजय सेतुपतीचा अभिनय प्रवास

===============

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांच्या पोस्टचे कौतुक तर केले. सोबतच स्वतःच्या आईच्या देखील आठवणी कमेंट्समध्ये पोस्ट केल्या आहेत. मिलिंद गवळी यांच्याबद्दल सांगायचे झाले तर मराठी टीव्ही विश्वातील सर्वात गाजलेल्या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका निभावली आहे.

मिलिंद गवळी आणि आई कुठे काय करते या मालिकेचे अनिरुद्ध देशमुख ही नकारात्मक भूमिका साकारत अफाट लोकप्रियता कमावली. नोव्हेंबरमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर आपली चांगलीच छाप पडली. मिलिंद यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये कामं केले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Entertainment Marathi Movie अभिनेता मिलिंद गवळी मिलिंद गवळी पत्र मिलिंद गवळी पोस्ट मुक्काम पोस्ट देवाचं घर
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.