Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mera Naam Joker : ‘ए भाय जरा देखके चलो’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

 Mera Naam Joker : ‘ए भाय जरा देखके चलो’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
बात पुरानी बडी सुहानी

Mera Naam Joker : ‘ए भाय जरा देखके चलो’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

by धनंजय कुलकर्णी 24/01/2025

आर के फिल्मचा ‘मेरा नाम जोकर’ (Mera Naam Joker) हा चित्रपट भले त्या काळात फ्लॉप झाला असला तरी नंतरच्या काळात मात्र या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. एक कल्ट क्लासिक मूवी म्हणून आज देखील हा चित्रपट ओळखला जातो. राज कपूर (Raj Kapoor) ला देखील आपला हा चित्रपट सर्वात आवडता चित्रपट होता. या चित्रपटाला बनायला तब्बल सहा वर्षे लागली. आर के चा ‘संगम’ हा चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आणि १९७० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दोन मध्यांतर असलेला हा चित्रपट होता. नंतर राजकपूर यांनी सिनेमाची लांबी कमी करून चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटातील गाणी आर केच्या परंपरेला साजेशी अशी होती. या चित्रपटापासूनच नीरज यांचा आर के कॅम्पसमध्ये प्रवेश झाला. (अर्थात या चित्रपटानंतर पुन्हा नीरज यांनी कधी आर केसाठी गाणी लिहिली नाहीत!) कवी नीरज आणि Prithviraj Kapoor यांची चांगली मैत्री होती. ते दोघे बऱ्याचदा एकत्र भेटून फिरायला जात असत एकत्र खाणे पिणे होत असे. (Mera Naam Joker)

एकदा नीरज यांनी पृथ्वीराज कपूर यांना विचारले,” तुम्ही माझ्या नावाची शिफारस राज कपूर कडे करा ना!” त्यावेळी पृथ्वीराज कपूर म्हणाले, ”राजकपूर यांचे प्रत्येक गीतकाराकडे बारीक लक्ष असते. तुझ्या गाण्यांची जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा राज कपूर स्वतः तुला बोलावतील!” आणि तसेच झाले. एकदा रात्री दोन वाजता पृथ्वीराज कपूर नीरज यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी सांगितले, ”उद्या तुला सकाळी राजकपूर यांना भेटायचं आहे. त्यांच्या आगामी सिनेमासाठी तुला गाणे लिहायचे आहे.”

गीतकार नीरज सकाळी राजकपूर यांना दोन भेटले. त्यावेळेला त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ (Mera Naam Joker) या चित्रपटातील जोकरची व्यथा मांडणारे गाणे लिहायला सांगितले. नीरज यांनी पुढच्या दोन दिवसात ‘कहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना चष्मा उतारो फिर देखो यारो दुनिया नई है चेहरा पुराना..’  हे गाणं लिहून दिलं. हे गाणं राजकपूर यांना खूपच आवडलं नंतर हे गाणं मुकेश यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं. यानंतर नीरज काही दिवस त्यांच्या गावी उत्तर प्रदेशात घेऊन गेले. (Untold stories)

तिथे गेले असताना राज कपूर यांचा त्यांना फोन आला ‘मेरा नाम जोकर’ (Mera Naam Joker) च्या आणखी एका गाण्यासाठी तुम्ही ताबडतोब मुंबईला या’ असे सांगितले. नीरज मुंबईला राज कपूर  यांना भेटले. राज कपूर नीरज यांना घेऊन त्यांच्या पुण्याजवळच्या लोणी येथील घरी घेऊन गेले आणि त्यांना सांगितले, ”इथे शांत माहौल आहे. तुम्हाला जोकरच्या तोंडून सर्कस आणि मानवी जीवन यावर एक फिलॉसॉफिकल गाणे लिहायचे आहे.” नीरज विचारात पडले. “जोकर आणि फिलॉसॉफिकल गाणे? कसे काय गाऊ शकेल?” राजकपूर म्हणाले, ”ते मला माहिती नाही. पण चित्रपटात जोकर आपल्या जीवनाचे सारे सार या गाण्यातून मांडतो असे मला दाखवायचे आहे.” नीरज यांन खूप विचार केला.

त्यांनी राज कपूर यांना सांगितले, ”जर गाणे जोकर गाणार असेल तर ते संवादात्मक गाणे असेल. त्यात संवाद असेल आणि काव्य देखील.” नीरज यांनी गाणे लिहिले ‘ए  भाय जरा देख के चलो आगे भी नही पीछे भी दाये भी नही बाये भी उपर भी नही नीचे भी…’ या गाण्यांमध्ये ओळी होत्या आणि काही संवाद देखील होते. हे गाणं जेव्हा शंकर जयकिशन यांच्याकडे पोहोचलं त्यावेळेला त्यांना हे गाणं बिलकुल आवडलं नाही. ते नीरज यांना म्हणाले, ”हे काय गाणं आहे कां? तुम्ही राजकपूर यांना मूर्ख बनवत आहात? या गाण्याची लायकी एक आण्याची देखील नाही. हे कवडीमोल असं गाणं आहे!” (Mera Naam Joker)

नीरज यांनी मात्र गाण्याचे शब्द बदलायला पण विरोध केला. शेवटी राज कपूर यांनी मध्यस्थी केली आणि ते नीरजला म्हणाले, ”तुम्हीच या गाण्याची चाल सुचवा. मला हे गाणे सिनेमात पाहिजे.” आता मात्र नीरज, शंकर जयकिशन एकत्र बसले. नीरज यांनी थोडीफार चाल सुचवली. जय किशन यांना ती आवडली आणि त्यातूनच गाण्याची चाल तयार झाली. नंतर मन्ना डे (manna dey) यांच्या स्वरामध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं. या गाण्यात नीरज यांनी आयुष्याचे सारे सार फार सुंदर रीतीने मांडले आहे. यात एका कडव्यात ते लिहितात.

============

हे देखील वाचा : Akhtar Mirza : ‘नया दौर’च्या कथेची निवड कशी झाली?

============

हां बाबू ,ये सर्कस है.
ये सर्कस है खेल तीन घंटो का.
पहला घंटा बचपन है.
दुसरा जवानी है..
तिसरा बुढापा है.
और उसके बाद?
माँ नहीं बाप नहीं बेटा नहीं बेटी नहीं तू नहीं मैं नहीं ये नहीं वो नहीं
कुछ भी नहीं कुछ भी नहीं
रहता है रहता है जो कुछ वो ख़ाली-ख़ाली काली कुर्सियाँ हैं ख़ाली-ख़ाली तम्बू है ख़ाली-ख़ाली घेरा है बिना चिड़िया का बसेरा है न तेरा है न मेरा है..’

चित्रपट (Mera Naam Joker) प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे रसिकांना खूप आवडले मन्नाडे यांना या गाण्यासाठी राष्ट्रीय आणि फिल्मफेअर दोन्ही पुरस्कार मिळाले!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Featured Manna Dey mera nam joker prithviraj kapoor Raj Kapoor shankar jaikishan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.